election
election sakal
महाराष्ट्र

महापालिका निवडणुकांसाठी 'या' दिवशी होणार आरक्षण सोडत

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : नवी मुंबई, वसई-विरारसह 13 महानगरपालिकांच्या निवडणूक आरक्षण सोडत कार्यक्रम येत्या 31 मे 2022 रोजी होणार आहे. आगामी काळात नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. (State Corporation Election News)

दरम्यान, यासाठी आरक्षण आणि सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार अनुसुचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्याकरिता सोडत काढण्यासाठी सोबतच्या परिशिष्ट-ड (मराठी)व परिशिष्ट-इ इंग्रजीमधील नमुन्यात जाहीर नोटीस प्रसिद्ध करणे. त्याआधी स्थानिक वर्तमानपत्रं, वेबसाईट, सूचना फलक इत्यादी 27/5/2022 पर्यंत प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर, अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण महिला यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी सोडत काढणे यासाठी 31/5/2022 ची वेळ देण्यात आली आहे.

सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करणे त्याची स्थानिक वर्तमानपत्रं, वेबसाईट, सूचना फलक इत्यादी प्रसिद्धी द्यावी यासाठी 01.06.2022 ची मुदत देण्यात आली आहे. तर, प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी 1 जून ते 6 जून पर्यंत देण्यात आला असून, आरक्षण निश्चितीबाबत प्राप्त झालेल्या हरकती सूचनांवर विचार करून प्रभागनिहाय अंतिम आरक्षण सोबतच्या परिशिष्ट-ड मधील नमुन्यात शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे यासाठी 13 जून 2022 ची मुदत देण्यात आली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्यातील रखडलेल्या निवडणुकांसंदर्भात सुप्रीम कोर्टाने सुनावणीवेळी राज्य निवडणूक आयोगाला जिथं पाऊस नसेल तिथं निवडणूक घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळं पावसाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका टप्प्याटप्प्यानं होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ओबीसी आरक्षणामुळं राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सध्या सुप्रीम कोर्टात निवडणुकांबाबत सुनावणी सुरु आहे.

जिल्हानिहाय आढावा घेऊन निवडणुका जाहीर कराव्यात असंही कोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला सुचवलं आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी पाऊस नाही त्या ठिकाणी निवडणुका घ्यायला हरकत नाही, असंही कोर्टानं म्हटलं आहे.येत्या काही दिवसांत पावसाळा सुरु होईल याच दरम्यान राज्यातील निवडणुका पार पडणार आहेत. पण निवडणुकांमध्ये अडथळा निर्माण होऊ नये यासाठी ज्या ठिकाणी पाऊस नसेल तिथं निवडणुका घ्यायला काय हरकत आहे? असं कोर्टानंच विचारल्यानं जिथे पाऊस नसेल तिथं आधी निवडणुका होण्याची शक्यता आहे तर जिथं पाऊस असेल तिथं नंतर निवडणुका घेतल्या जाऊ शकतात.

दरम्यान, सुप्रीम कोर्टानं याआधीच्या सुनावणीवेळीच राज्य निवडणूक आयोगाला स्पष्ट आदेश दिले होते की, ओबीसी आरक्षणाविना दोन आठवड्यात निवडणूक प्रक्रिया जाहीर करावी. त्यानंतर राज्यातील १४ महापालिकांच्या प्रभाग रचना अंतिम करण्याची सध्या लगबग सुरु आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेनं नुकतीच अंतम प्रभाग रचना जाहीर केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT