Chhatrapati Shivaji Maharaj Museum esakal
महाराष्ट्र बातम्या

शिवरायांचा आठवावा प्रताप! 17 व 18 व्या शतकातील 'ही' शिवकालीन शस्त्रे देतात शौर्याची प्रेरणा; वाघनखे किती महिने पाहता येणार?

लंडन येथील व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममधील ऐतिहासिक वाघनखे साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात (Chhatrapati Shivaji Maharaj Museum) ठेवण्यात आली आहेत.

प्रशांत घाडगे

शिवछत्रपतींची शौर्याची प्रेरणा पुढील पिढीला मिळावी, यासाठी शिवकालीन शस्त्रे, पत्रांचा संग्रह, शिवकालीन नाणी, चिलखतं, तलवारी, तोफा आणि अन्य वस्तूंचे संवर्धन केले आहे. साताऱ्यातील संग्रहालयात ते पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) जाज्वल्य इतिहासाची आणि शौर्याची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक वस्तू या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहेत. ‘शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप,’ या शौर्य पंक्तीप्रमाणे प्रत्येक जण शिवरायांकडून लढण्याची, जिंकण्याची आणि संकटाला धैर्याने सामोरे जाण्याची शिकवण घेतो. शिवकाळामध्ये शस्त्रांचे महत्त्व असामान्य होते. त्यामुळे शिवकालीन शस्त्रे हा प्रत्येकाचा औत्सुक्याचा विषय आहे.

शिवछत्रपतींची शौर्याची प्रेरणा पुढील पिढीला मिळावी, यासाठी शिवकालीन शस्त्रे, पत्रांचा संग्रह, शिवकालीन नाणी, चिलखतं, तलवारी, तोफा आणि अन्य वस्तूंचे संवर्धन केले आहे. साताऱ्यातील संग्रहालयात ते पाहण्यासाठी उपलब्ध आहे. दरम्यान, लंडन येथील व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममधील ऐतिहासिक वाघनखे साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात (Chhatrapati Shivaji Maharaj Museum) ठेवण्यात आली आहेत. त्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन आज (शुक्रवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्त संग्रहालयातील शिवकालीन १७ व १८ व्या शतकातील शस्त्रास्त्रे व ऐतिहासिक वस्तूंचा दै. ‘सकाळ’ने घेतलेला आढावा...

दांडपट्टा : छत्रपती शिवाजी महाराज व त्यानंतरच्या काळात अनेक लढायांमध्ये दांडपट्टा वापरण्यात आला होता. पट्ट्याचे पाते पोलादी व खोबळा लोखंडी आहे. खोबळ्यावर सोन्याचे पाणी चढविलेले असून, संपूर्ण पृष्ठभागावर भौमितिक आकार आणि पानाफुलांची नक्षी कोरलेली आहे. याची लांबी १३२ सेंटीमीटर असून, वजन एक किलो नऊ ग्रॅम आहे.

कुऱ्हाड : या कुऱ्हाडीचा दंड वेताचा असून, दंडाच्या डाव्या बाजूला अर्धचंद्राकृती लोखंडी पाते जोडलेले आहे. कुऱ्हाडीची रचना साधी असून, एकधारी पात्याला अंतर्वक्र धार आहे.

अंकुश : अंकुश आकाराने लहान असून, पोलादापासून बनविलेला आहे. अंकुशाचे पाते तीक्ष्ण व अणकुचीदार असून, बदामाच्या आकाराचे आहे. पात्याच्या उजव्या बाजूला निमुळता वक्र भाग बनविलेला आहे.

तोडेदार बंदूक : ही बंदूक तोड्याच्या यंत्रणेची असून, लांब व निमुळती आहे. नळीच्या तोंडाशी कोरीव नक्षी असून, दस्त्यावर पुसट झालेल्या खवल्यांची नक्षी आहे. दस्त्याच्या पुढे दोरी गुंडाळणाऱ्या सर्पेटाईन व दारू भरण्यासाठी फायरिंग पॅन आहे. या बंदुकीची लांबी १७१ सेंटीमीटर असून, वजन चार किलो दोन ग्रॅम आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Museum

किवकीची पाटीलकी मल्हारजी निगडे देशमुख यांची असता ती हिरोजी इंदलकर यांना विकली. ती पुन्हा निगडे देशमुख यांच्या स्वाधीन करण्याबाबत बालाजी कुकाजीप्रभू हवालदार व कारकून यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे दुर्मीळ पत्र.

कट्यार : कट्यार पोलादाची बनविलेली असून, संपूर्ण मुठीवर सोन्याचे पाणी चढविलेले आहे. कट्यारीच्या नखेवर दोन्ही बाजूने संस्कृतमध्ये तीन ओळी लिहिलेल्या आहेत. कट्यारीला निळ्या रंगाचे लाकडी म्यान असून, सिंहमुद्रा व चांदीचे मुहनाल आहे. शिवरायांच्या काळात कट्यार अंगाशी बाळगले जात होते.

झिराह चिलखत : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी चिलखत वापरले जात होते.

Chhatrapati Shivaji Maharaj Museum

सोसनपत्ता तलवार : सोसनपत्ता ही एकधारी असून, पात्याची धार अंतर्वक्र आहे. तलवारीच्या मूठ व चिमट्यावर सोन्याचे नक्षीकाम केले आहे. या तलवारीची एकूण लांबी ८३ सेंटीमीटर असून, वजन एक किलो एक ग्रॅम आहे.

शिकरगाह तलवार : या तलवारीच्या पात्यावर शिकारीची दृश्‍ये व विविध ठिकाणी प्राणी, पर्णघट व त्रिशूळधारी देवतेच्या आकृत्या कोरलेल्या आहेत. मुठीच्या पृष्ठभागावर बेलबुट्टीच्या नक्षीचे चांदीचे छापकाम केले आहे.

पट्टीसा तलवार :ही तलवार सरळ पात्याची असून, दुधारी आहे. तलवारीचे पाते पोलादी असून, मूळ चांदीची आहे. पाते खजिन्याखालील भागात तुटलेले असून, चांदीच्या पट्टीने पुन्हा जोडलेले आहे. याचे वजन ९९० ग्रॅम आहे.

बल्लम भाला : हा भाला शिवाजी महाराजांच्या काळात वापरण्यात आला असून, एकूण लांबी १०८ सेंटीमीटर आहे. वजन ८०० ग्रॅम असून, भाल्याचे पाते आणि दंड लाकडी आहे. भाल्याची गर्दन पितळी व नक्षीदार आहे.

बरचा भाला : हा भाला संपूर्ण धातूचा असून, दंडावर मध्यभागी स्वतंत्र पकड आहे. भाल्याच्या दंडावर खवल्यांचे व गोल कोरीव नक्षीकाम आहे. भाला एक किलो दोन ग्रॅमचा असून, पाते धातूचे बनविलेले आहे. लांबून शत्रूवर हल्ला करण्यासाठी शिवकालीन व त्यानंतरच्या काळातही भाल्याचा वापर केला जात होता.

Chhatrapati Shivaji Maharaj Museum

मोगलांशी झालेल्या युद्धाप्रसंगी खजिन्यावर ताण पडू नये म्हणून वतनी मुलखातून रक्कम जमा करण्याबाबत छत्रपती शिवाजी महाराजांचे पत्र.

वक्र धोप तलवार : वक्र धोप तलवार दुर्मीळ तलवारीपैकी एक आहे. तलवारीचे पाते पिपळ्याच्या भागातून वक्र झाली असून, धोपेचे पाते मुल्हेरी घाटाच्या मुठीतून स्वतंत्रपणे बसविण्यात आली आहे.

दोरीचा बरचा : हा बरचा भाल्याला दोरी असून, शिवरायांच्या काळात दोरी बांधून लांबून मारण्यासाठी या भाल्याचा वापर केला जात होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT