CM Eknath Shinde  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : CM शिंदेंना फडणवीस देणार मोठा झटका? ठाकरेंच्या दाव्यामुळे राजकीय खळबळ

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत आणि सरपंच निवडणुकीत यश मिळाल्याचा शिंदे गटाचा दावा खोटा असल्याचेही ठाकरेंनी म्हटले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Political Crises : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का देऊ शकतात, असा दावा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने केला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातील रोखठोकमधून हा दावा करण्यात आला आहे. यामध्ये शिंदे गटातील 40 पैकी 22 आमदार लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेच्या या दाव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

सामनामधील रोखठोक कॉलममध्ये शिंदे यांचा मुख्यमंत्र्यांची खूर्ची गणवेश काढला जाईल, असे आता सर्वांनाच समजल्याचे यामध्ये म्हटले आहे. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील ग्रामपंचायत आणि सरपंच निवडणुकीत यश मिळाल्याचा शिंदे गटाचा दावा खोटा असून, शिंदे गटाचे 22 आमदार नाराज आहेत. यातील बहुतांश आमदार भाजपमध्ये विलीन होणार असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे रोखठोकमध्ये म्हटले आहे. शिंदे यांच्या कृतीमुळे महाराष्ट्राचे खूप नुकसान झाले असून, राज्य त्यांना माफ करणार नाही आणि भाजप आपल्या फायद्यासाठी शिंदे यांचा वापर करत राहील, असे प्रकाशित करण्यात आलेल्या लेखात नमुद करण्यात आले आहे.

शिंदे यांचा दिल्लीत प्रभाव नाही

वरील दाव्याशिवा ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. ज्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांचे विकासात योगदान दिसत नसून, देवेंद्र फडणवीस सर्वत्र दिसत आहेत. फडणवीस मंगळवारी दिल्लीत गेले व मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याच्या महत्त्वाकांक्षी धोरणांतर्गत धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी रेल्वेकडून महाराष्ट्र सरकारला हव्या असलेल्या जागेसाठी रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी घेऊन आले. याचाच अर्थ शिंदे यांचा दिल्लीत प्रभाव नाही हे स्पष्ट होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: मराठीत बोललो तर माध्यम माझी भावना सर्व महाराष्ट्रातील लोकांना लाईव्ह दाखवतील - फडणवीस

Thane Politics: मराठीचा मुद्दा चिघळला; मनसे महिला पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

M Phil Professors : १४२१ प्राध्यापकांना मिळाला दिलासा! एम. फिल धारक प्राध्यापकांना अखेर नेट/सेटमधून सूट

SCROLL FOR NEXT