Maharashtra Politics Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: शिंदे सरकार पडणार? "22 आमदार सोडण्याच्या मनस्थितीत तर 9 खासदारही संपर्कात"

शिवसेनेत गेल्या काही दिवसात नाराजीचे सुर दिसून येत आहेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

शिवसेनेत गेल्या काही दिवसात नाराजीचे सुर दिसून येत आहेत. अशातच काही मंत्री आमदार शिंदे गट सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. अशातच बालाजी किणीकर शिवसेना सोडणार असल्याच्या तयारीत आहेत. ते मातोश्रीवर परत घ्या म्हणत असल्याचा दावा काल राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. अशातच 22 आमदार शिंदे गटाला सोडण्याच्या मनस्थितीत असून 9 खासदारही संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट ठाकरे गटाच्या नेत्याने केला आहे.

शिंदे गटाचे २२ आमदार वैतागले असून हे आमदार शिंदे गटातून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत आहेत. 13 पैकी 9 खासदारही आमच्या संपर्कात आहेत. खासदारही शिंदे गटाला वैतागले आहेत. कामं होत नाहीत, तुच्छतेची वागणूक मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वत:चं बुड स्थावर केलं आहे.

इतर कुणालाही किंमत मिळत नाही, अशी तक्रार या आमदार, खासदारांनी केला असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या दाव्याने राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शंभूराजे देसाईंनी पंधरा दिवसापूर्वी उद्धव ठाकरेंना निरोप पाठवला होता. आमची इकडे गळचेपी होत आहे, असं शंभुराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितल असल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला आहे.

तानाजी सावंत आणि गजानन कीर्तिकर यांनी प्रतिक्रीया दिली आहे. तानाजी सावंत यांना बजेट मिळत नाही. आगीतून फुफाट्यात पडल्याचं ते म्हणत आहेत. भाजपने आता शिंदे गटाला नामोहरण करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. त्यामुळेच शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांची कोंडी झाल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT