sansad Sakal
महाराष्ट्र बातम्या

लोकसभा निवडणुकीसाठी २३ हजार कर्मचारी! आचारसंहितेपूर्वी प्रशिक्षणाचा पहिला टप्पा; जिल्ह्यात ३५९९ मतदान केंद्रे; मतदानासाठी ४५०० ईव्हीएम

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे. आचारसंहितेनंतर निवडणुकीच्या तयारीसाठी साधारणत: ३० ते ३५ दिवस लागतात. मास्टर ट्रेनरचे प्रशिक्षण झाले असून दुसऱ्या टप्प्यात सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण होणार आहे. आचारसंहिता जाहीर झाल्यावर २३ हजार कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होईल.

तात्या लांडगे

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रशासकीय स्तरावरील तयारी सुरू झाली आहे. आचारसंहितेनंतर निवडणुकीच्या तयारीसाठी साधारणत: ३० ते ३५ दिवस लागतात. आता पहिल्यांदा मास्टर ट्रेनरचे प्रशिक्षण झाले असून दुसऱ्या टप्प्यात सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण होणार आहे. आचारसंहिता जाहीर झाल्यावर २३ हजार कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होईल.

लोकसभेची मतदार यादी अंतिम झाल्यानंतर ३० जानेवारीला पहिल्यांदा प्रांताधिकारी, तहसीलदारांनी मास्टर ट्रेनरचे ट्रेनिंग घेतले आहे. ईव्हीएमचा वापर, पोलिंग बुथ, निवडणुकीचा खर्च, आचारसंहिता, तंत्रज्ञान अशा विविध विषयांवर हे प्रशिक्षण देण्यात आले आहे. नायब तहसीलदार, मंडालाधिकारी, आयटीआयचे निदेशक, ट्रेझरीचे अधिकारी, वित्त व लेखामधील अधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे.

आता ५ ते ९ फेब्रुवारीला पुण्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघामधील सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण ठेवण्यात आले आहे. जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रे अंतिम केली आहेत. आता संवेदनशील मतदान केंद्रांची यादी तयार केली जात आहे. सोलापूर जिल्ह्यात लोकसभेसाठी तीन हजार ५९९ मतदान केंद्रे आहेत.

निवडणुकीसाठी २५ टक्के ‘ईव्हीएम’ ज्यादा

सोलापूर जिल्ह्यात सोलापूर व माढा असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. जिल्ह्यात यंदा ३२ मतदान केंद्रे वाढली असून एकूण तीन हजार ५९९ मतदान केंद्रांची यादी अंतिम झाली आहे. दरम्यान, निवडणुकीसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एकूण मतदान केंद्रांच्या २५ टक्के ईव्हीएम ज्यादा देण्यात आल्या आहेत. तांत्रिक बिघाड झाल्यास त्यांचा वापर तत्काळ शक्य होईल हा त्यामागील हेतू आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी साडेचार हजार ईव्हीएम प्राप्त असून त्याची तपासणी करून त्या गोदामात ठेवण्यात आल्या आहेत.

शिक्षकांसह २३ हजार कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्यूटी

सोलापूर जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जवळपास २३ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यांची यादी अंतिम झाली असून वर्ग एक ते तीन कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनाही निवडणूक ड्यूटी करावी लागणार आहे. निवडणुकीपूर्वी त्यांना दोनदा प्रशिक्षण दिले जाणार आहे. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर मतदानापूर्वी १५ दिवस अगोदर उमेदवारांची नावे, मतपत्रिका अशी ‘ईव्हीएम’शी संबंधित कामे पूर्ण केली जातील.

निवडणुकीच्या अनुषंगाने युद्धपातळीवर कार्यवाही

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू झाली असून ३० जानेवारीला मास्टर ट्रेनरचे प्रशिक्षण झाले आहे. आता ५ ते ९ फेब्रुवारीला पुण्यात सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण होईल. मागील निवडणुकीवेळी १० मार्च रोजी आचारसंहिता जाहीर झाली होती, यंदाही तोच अंदाज गृहीत धरून युद्धपातळीवर कार्यवाही सुरू आहे.

- गणेश निऱ्हाळी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

VIDEO : रेल्वे पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुलं बुडाली; चौघांची प्रकृती चिंताजनक...यवतमाळमधील घटना, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT