onion esakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापूर बाजार समितीत आवक २४६ गाड्या, तरी भाव १८०० रुपयेच! शेतकऱ्यांना दररोज कोट्यवधींचा फटका; विकलेल्या कांद्याचे बिल १५ दिवसानंतर

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २५) २४६ गाड्या कांद्याची आवक झाली होती. पण, शेतकऱ्यांना सरासरी भाव अठराशे रुपयांपर्यंतच मिळाला. अवघ्या १० क्विंटल कांद्याला चार हजार ३०० रुपयांचा भाव मिळाला.

तात्या लांडगे

सोलापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २५) २४६ गाड्या कांद्याची आवक झाली होती. पण, शेतकऱ्यांना सरासरी भाव अठराशे रुपयांपर्यंतच मिळाला. अवघ्या १० क्विंटल कांद्याला चार हजार ३०० रुपयांचा भाव मिळाला.

सोलापूर जिल्ह्यात पावसाळ्याच्या सुरवातीला ४० हजार हेक्टरवर कांद्याची लागवड झाली होती. पण, सततच्या पावसामुळे व सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने निम्म्याहून अधिक क्षेत्रावरील कांदा जागेवरच खराब झाला. अशीच स्थिती राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये होती. त्यामुळे सुरवातीपासूनच बाजारात कांद्याची आवक मागणीच्या प्रमाणात आली नाही. अजूनही आवक कमी असताना देखील कांद्याचे दर मागील २० दिवसांच्या तुलनेत निम्म्याने कमी झाले आहेत.

बुधवारी सोलापूर बाजार समितीत २४ हजार ६०१ क्विंटल कांदा आला होता. त्यातील २४ हजार ५७६ क्विंटल कांद्याला सरासरी अठराशे रुपयांपर्यंत भाव मिळाला. १५ क्विंटल कांदा २०० रुपये प्रतिक्विंटल या भावाने विकला गेला. कांद्याचे दर घसरले असताना देखील व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या मुदतीचे धनादेश दिले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना विकलेल्या कांद्याची रक्कम हाती येण्यासाठी तेवढे दिवस वाट पाहावी लागत आहे.

बुधवारी साडेचार कोटींची उलाढाल

बुधवारी (ता. २५) सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण ४९ हजार २०२ पिशव्या कांदा आला होता. कांद्याचा सरासरी भाव तीन ते साडेतीन हजारांपर्यंत असताना एवढ्या पिशव्यांमधून ८ ते ९ कोटींची उलाढाल होत होती. पण, आता भावात घसरण झाल्याने बुधवारी २४६ गाड्यांची आवक असताना देखील उलाढाल केवळ चार कोटी ४३ लाखांपर्यंतच झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway : पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी! नांदेड आणि हरंगुळ एक्स्प्रेस गाड्या २६ जानेवारीपासून हडपसरवरून सुटणार, पहा नवीन वेळापत्रक

IPL 2026: राजस्थान रॉयल्सला मिळाली द्रविडची रिप्लेसमेंट! जडेजाला संघात घेतल्यानंतर जाहीर केला मोठा निर्णय

Latest Marathi Breaking News : बुलढाण्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी

Mumbai Crime: अंधेरीत विद्यार्थ्याला श्वानासोबत संबंध ठेवायला भाग पाडलं, ब्लॅकमेल करत बळजबरीनं लिंगबदल करायला लावलं; तृतीयपंथीयांकडून अत्याचार

Pune Cyber Fraud : पुण्यात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; पार्टटाइम जॉब आणि शेअर ट्रेडिंगच्या नावाने ९८ लाखांची फसवणूक

SCROLL FOR NEXT