Benzo Chemical
Benzo Chemical esakal
महाराष्ट्र

Benzo Chemical कंपनीला तब्बल २५० कोटींचा दंड; काय आहे प्रकरण?

सकाळ डिजिटल टीम

मलकापूर येथील बेंजो कॅमिकल कंपनीने गत दहा वर्षांपासून रसायनयुक्त सांडपाणी खुल्या जागेत सोडल्याने तसेच दूषित पाणी पावसाच्या पाण्यात मिसळल्याने ५० शेतकऱ्यांची २५० एकर जमीन नापीक झाली. याप्रकरणी राष्ट्रीय हरित लवाद न्यायालयाने कंपनीला २५० कोटी रुपये दंड ठोठावला आहे. इतकेच नव्हे तर हा दंड तीन महिन्यांच्या आत जमा करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. (250 crore penalty to benzo chemical industries for the pollution crime by national green arbitration in malkapur )

मलकापूर तालुक्यातील दसरखेड एमआयडीसीमध्ये २५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या बेंजो कॅमिकल कंपनीच्या दूषित पाण्यामुळे शेतजमिनीसह पाणी स्रोतांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार दाखल केली आहे. कंपनीच्या परवान्यातील अटी व शर्ती, तसेच पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कंपनीला २५० कोटी रुपये दंड राष्ट्रीय हरित लवाद न्यायालयाने दिला आहे.

न्यायालयाकडे जाण्यापूर्वी शेतकऱ्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ अकोला यांच्याकडे तक्रारी केल्या, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही.

कंपनीतून वाहणारे विषारी पाणी वाघोळा, म्हैसवाडी, रणथम, दसरखेड या परिसरातील विहिरींमध्येही मिसळत होते. त्यामुळे दसरखेड येथील अरविंद महाजन, निना धारकर, गोविंदराव डोसे, विनोद एकडे, उमेश नारखेडे आणि इतर ४५ शेतकऱ्यांनी पुणे येथील हरित लवाद न्यायालयात प्रकरण अँड. साहेबराव मोरे यांच्यामार्फत दाखल केले होते. याचिकाकर्त्याची बाजू एड. बिना परदेशी यांनी मांडली. न्यायालयाने दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून घेत २९ ऑगस्ट रोजी निर्णय दिला.

यात गेल्या दहा वर्षांत पर्यावरणासह शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत बेंजो कंपनीला जबाबदार धरत प्रत्येकी २५ कोटी रुपये प्रतिवर्ष दंडाप्रमाणे 10 वर्षांचे 250 कोटी रुपये दंड बेंजो कंपनीला ठोठविण्यात आला आहे. तसेच भविष्यात कंपनीकडून अशा प्रकारचे उल्लंघन आढळल्यास त्यांच्याविरुद्ध गंभीर कायदेशीर कारवाई केली जाईल, असाही आदेश हरिद लवाद न्यायालयाने दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: बंगालमध्ये वाद पेटला, TMC-ISF समर्थकांमध्ये हाणामारी, भाजपचा आरोप- पराभवाच्या भीतीने हिंसाचार

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT