महाराष्ट्र बातम्या

राज्यात आज लसीकरणाचा श्रीगणेशा; 28 हजार 500 जणांना देणार डोस

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोना प्रतिबंधक लस राज्यातील 28 हजार 500 आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शनिवारी (ता. 16) घेता येईल, अशी व्यवस्था सार्वजनिक आरोग्य विभागाने केली आहे. राज्यात 285 लसीकरण केंद्र पहिल्या दिवशी कार्यान्वित होणार असून, प्रत्येक केंद्रावर दिवसभरात 100 कोरोना योद्‌ध्यांना लस दिली जाणार आहे. 

राज्यात सुरवातीला 511 लसीकरण केंद्र निश्‍चित केले होते. मात्र, पहिल्या दिवशी फक्त 285 केंद्रांवरच लसीकरण होणार आहे. प्रत्येक केंद्रावर 100 याप्रमाणे 28 हजार 500 आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येईल. त्याची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य खात्याने दिली. देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला शनिवारपासून सुरवात होणार आहे. महाराष्ट्राही त्यासाठी सज्ज झाला आहे. केंद्राने सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची "कोव्हिशिल्ड' या लसीचे एक कोटी 10 लाख डोस खरेदी केले असून भारत बायोटेकने विकसित केलेल्या "कोव्हॅक्‍सिन'चे प्रत्येक राज्यासाठी 20 हजार डोस घेतले आहेत. राज्यातील 358 पैकी सहा केंद्रांवर कोव्हॅक्‍सिन तर, उर्वरित 352 केंद्रांवर कोव्हिशिल्ड ही लस वितरित केली आहे. पुणे आणि अमरावतीमधील जिल्हा रुग्णालय आणि मुंबईतील जे. जे., सोलापूर, औरंगाबाद, नागपूर या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोव्हॅक्‍सिनची लस वितरित केली आहे. या केंद्रावर येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना हीच लस घ्यावी लागणार आहे. त्यासाठी संमतिपत्र देणे बंधनकारक केले आहे. मात्र, कोव्हिशिल्डसाठी हे संमतिपत्र लागणार नाही, असे आरोग्य खात्याने स्पष्ट केले. 

जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. सचिन एरंडे म्हणाले, ""पुणे जिल्ह्यातील 31 लसीकरण केंद्रांवर लस देण्याची व्यवस्था केली आहे. त्यात सर्वाधिक केंद्रे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आहेत. तेथे 15 केंद्र असून, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रत्येक आठ लसीकरण केंद्र आहेत. त्यातून तीन हजार 100 जणांना लस दिली जाईल.'' 

लसीकरणासाठी पुणे जिल्हा रुग्णालयात कोव्हॅक्‍सिनची लस तर उर्वरित 30 केंद्रांवर कोव्हिशिल्ड देणार आहे. प्रत्येक केंद्रावर एका दिवशी 100 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल. त्यामुळे पहिल्या दिवशी तीन हजार 100 जणांना लस देण्यात येईल. शनिवारी लस घेतलेल्यांना 28 दिवसांनंतर लशीचा दुसरा डोस राखीव ठेवला आहे. 
- डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक, पुणे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT