राजेश टोपे
राजेश टोपे  Sakal
महाराष्ट्र

राज्यात कोरोनाचा आलेख वाढला; 46,723 रूग्णांची नोंद

निनाद कुलकर्णी

मुंबई : राज्यात आज 46,723 हजार नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली असून, आज 32 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याचा पॉझिटिव्हिटी दर 21.4 इतका झाला आहे. रूग्णसंख्या जरी वाढत असली तरी 86 टक्के लोक हे होम क्वारंटाइनमध्ये असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. (Maharashtra Records 46, 723 Corona Cases)

दरम्यान, राज्यात आज २८,०४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात आजपर्यंत एकूण ६६,४९,१११ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.५२% एवढे झाले आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,११,४२,५६९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७०,३४,६६१ (९.८९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १५,२९,४५२ व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत, तर ६९५१ व्यक्ती सांस्थातमक क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ८६ ओमिक्रॉनचे (Omicron) रुग्ण आढळून आले असून, यामध्ये पुणे मनपा– ५३, मुंबई- २१, पिंपरी चिंचवड – ०६, सातारा - ०३, नाशिक - ०२, पुणे ग्रामीणमध्ये एका ओमिक्रॉन बाधिताचा समावेश आहे. (Maharashtra Corona Latest News In Marathi)

टोपे म्हणाले की, रूग्णसंख्या कमी होतीये अशा भ्रमात जनतेने राहू नये, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. राज्यात 1 टक्क्यापेक्षा कमी रूग्ण आयसीयूत असून 0.32 टक्के रूग्ण व्हेंटिलेटरवर (Ventilator) असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या राज्यात 2.8 टक्के रूग्ण गंभीर असून, मृत्यूदर (Death Due To Covid ) देखील कमी आहे. आज 0.03 टक्के मृत्युदर नोंदविण्यात आला आहे. वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सध्या दोन लाख टेस्ट करत (Corona Test) आहोत. एखाध्याला लक्षणं जरी नसली तरी त्याने घरी थांबावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी नागरिकांना केले. काही जण पॉझिटिव्ह येतात मात्र, त्याचा रिपोर्ट आरोग्य विभागाला कळवत नसल्याचे सांगत टोपे म्हणाले की, सेल्फ टेस्टिंग जरी केले तरी नागरिकांनी जवळच्या आरोग्य विभागाला कळविणे गरजेचे आहे.

लसीकरणाबाबत (Vaccination) बोलताना ते म्हणाले की, पहिले लसीकरण साधारण साडे आठ लाखांच्या आसपास होत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून लसीकरण करण्याकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे ही आकडेवारी सहा लाखांच्या जवळ पोहोचली आहे. नागरिक सर्व सवलती घेत आहेत मात्र लस घेत नाही, असे टोपे म्हणाले. दरम्यान, राज्यात लसीकरणाला गती येण्यासाठी जिल्हास्तरावर कारवाई केली जावी असे ते म्हणाले. राज्यात लसीचा पहिला डोस घेतलेल्यांचे प्रमाण 90 टक्के आहे तर, दुसरा डोस घेतलेल्यांचे प्रमाण 62 टक्के आहे. 15 ते 18 वयोगटातील मुलांचे आतापर्यंत 35 टक्के लसीकरण पूर्ण झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT