Sanjay Raut  Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

भाजपचे ५० आमदार महाविकास आघाडीच्या संपर्कात; संजय राऊतांचा दावा

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी याप्रकरणी केलेल्या दाव्यानं खळबळ उडाली होती.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भाजपकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकारला वारंवार टार्गेट केलं जात आहे. त्यातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीतील २५ आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली होती. पण आता दानवेंना संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपचे ५० आमदार महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (50 BJP MLA in touch with Mahavikas Aghadi Sanjay Raut claim)

राऊत म्हणाले, "माझ्या माहितीप्रमाणं रावसाहेब दानवे हे भांग पित नाहीत किंवा इतर कुठलंही व्यसन करत नाहीत. त्यांना कदाचित १२५ आमदार असं बोलायचं असेल पण त्यांची स्पीलप ऑफ टंग झाली आहे. जर तुमच्या संपर्कात आमदार आहेच तर त्यांना घेऊन टाका ना. कालची नशाच अजून उतरली नसेल त्यामुळं त्यांना आज काही आठवणार नाही. पण भाजपचे ५० आमदार खोरखरच आमच्या संपर्कात आहेत"

रावसाहेब दानवे काल धुवळड खेळल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले होते की, "महाविकास आघाडीत अनेक आमदार नाराज आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनावरही ते बहिष्कार टाकणार होते. पण त्यांनी आम्ही समजूत काढली. पण निवडणुका जवळ येताच ते भाजपवासी होतील. आत्ताच त्यांची नाव उघडं केली तर त्यांची आमदारकी धोक्यात येईल"

दरम्यान, एमआयएमला महाविकास आघाडीत घेण्याचा प्रश्नच येत नाही असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. एमआयएम ही भाजपची बी टीम आहे हे आपण उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये पाहिलं आहे. त्यामुळं त्यांच्यासोबत कुठलीही युती होऊ शकत नाही. औरंगजेबाच्या कबरीपुढं नतमस्तक होणारे कधीही महाराष्ट्राचे आणि शिवसेनेचे आदर्श होऊ शकत नाहीत, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: 'सीएम'पदासाठी भाजपात पक्ष विलिन करण्याची शिंदेंची तयारी - संजय राऊतांचा टोला!

IND vs ENG 3rd Test: रिषभ पंतने २५ मिनिटं नेट्समध्ये फलंदाजी केली, पण...! जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स, Video

Pune ISIS sleeper cell: मोठी बातमी! पुणे ‘इसीस स्लीपर सेल मॉड्युल’ प्रकरणी अकरावी अटक; तीन लाखांचा होता इनाम!

SCROLL FOR NEXT