Koyna Dam esakal
महाराष्ट्र बातम्या

Koyna Dam : कोयना धरणातून 50 क्युसेस पाण्याचा विसर्ग बंद; जलाशयात फक्त 10.82 टीएमसी साठा शिल्लक

मॉन्सूनच्या पावसाने (Monsoon Rain) दडी मारल्यामुळे कोयना धरणाच्या (Koyna Dam) पाणीसाठ्याने तळ गाठला आहे.

सकाळ डिजिटल टीम

आजपर्यंत कोयनानगर येथे ७७ मिलिमीटर, नवजाला ८८ मिलिमीटर व महाबळेश्‍वरला १०२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पाटण : मॉन्सूनच्या पावसाने (Monsoon Rain) दडी मारल्यामुळे कोयना धरणाच्या (Koyna Dam) पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. जलाशयात फक्त १०.८२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, आजपासून पायथा वीजगृहातून होणारा एक हजार ५० क्युसेस पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे.

पावसाचे आगमन झाले नाही तर कोयना आणि कृष्णा नदीच्या (Krishna River) काठावरील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. आजपर्यंत कोयनानगर येथे ७७ मिलिमीटर, नवजाला ८८ मिलिमीटर व महाबळेश्‍वरला १०२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

धरणात १०.८२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, उपयुक्त पाणीसाठा फक्त ५.८८ टीएमसी आहे. पाऊस पडेल अशी परिस्थिती दिसून येत नाही. त्यामुळे कोयना धरण व्यवस्थापनाने आजपासून पूर्वेकडे सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी करण्यात येणारा व सुरू असलेला एक हजार ५० क्युसेस पाण्याचा विसर्ग बंद केलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT