50 khoke rapper ram mungase arrested rohit pawar jitendra awad rap song on shinde faction  
महाराष्ट्र बातम्या

50 Khoke Rap Song : ५० खोक्यांवर रॅप बनवणाऱ्या 'त्या' कलाकराला अटक; पवार-आव्हाड संतापले!

रोहित कणसे

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांना सोबत घेत बंड केलं. या बंडामुळे उद्धव ठाकरेंना मंत्रीपद गमवावं लागलं. यानंतर राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. या सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे गटातील आमदारांना ५० खोके घेतल्याचा आरोप करण्यात आला.

महाराष्ट्रातील सत्तानाट्यावर आधारित एक रॅप गाणं राज मुंगासे या रॅपरने तयार केलं होतं. या मराठी गाण्यामध्ये ५० खोके आणि चोर अशा शब्दांचा उल्लेख करण्यात आला होता. दरम्यान सोशल मीडियावर हे गाणे व्हायरल झाल्यानंतर अंबरनाथमधील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आता या तरुणाला पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर येत आहे.  राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दल ट्वीट केले आहे.

हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

रोहित पवार काय म्हणालेत?

"आपल्या रॅप साँग मध्ये कुणाच्याही नावाचा उल्लेख नसतानाही राम मुंगासे या तरुण कलाकाराला ५० खोके या शब्दामुळं अटक होत असेल तर हा सरकारचा कबुलीजबाबच नाही का?" असे रोहित पवार म्हणाले आहेत.

"शिव्याचं कुणीही समर्थन करत नाही, पण राज्यातील खुद्द एका मंत्र्यानेच महिला लोकप्रतिनिधीला अर्वाच्च शिविगाळ केली तेंव्हा कारवाई करण्याऐवजी सरकारने कानात बोटं घातली आणि डोळे बंद केले. ब्रिटीश राजवटीची आठवण करुन देणारा हा धोकादायक कारभार आहे." असे रोहित पवार म्हणाले आहेत.

आव्हाड काय म्हणालेत?

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील या रॅपरच कौतुक केलं होतं. तसेच राम मुंगासे या नवोदित कलाकाराने एक गाणं म्हटलं म्हणून त्याच्या घरातून संभाजीनगर पोलीसांनी त्याला अटक केली व ते त्याला अंबरनाथ पोलीसांच्या हाती देतील.

पण, त्याचा गुन्हा काय? त्याने तर कोणाचे नाव देखिल घेतले नव्हते. ५० खोके हे कोणाचे नाव आहे का हे आधी पोलीसांनी स्पष्ट करावं. ५० खोके या वक्तव्याने जातीय तणाव किंवा धार्मिक तणाव निर्माण होतो कसा हे पोलीसांनी सिद्ध करावं.

म्हणजे संविधान पायदळी तुडवण्याचाच निर्णय झाला आहे असे दिसतं. आम्ही सगळे राम मुंगासे याच्या पाठिशी आहोत. संपूर्ण महाराष्ट्र त्याच्या पाठिशी उभा राहील. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा गोठू शकत नाही. हे पोलीसी राज नाही, असंं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT