Eknath Shinde Esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde: शिंदे गटाचा कामाख्या देवीचा नवस फिटणार

शिवसेनेत बंड केल्यानंतर शिंदे कामाख्या देवीला नवस बोलले होते

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक 50 आमदार, आणि 13 खासदारांसह कामाख्या देवीच्या दर्शनासाठी 26 आणि 27 नोव्हेंबर रोजी गुवाहाटीला जाणार आहेत. शिवसेनेत बंड केल्यानंतर शिंदे कामाख्या देवीला नवस बोलले होते, तो नवस फेडण्यासाठी हा दौरा आखल्याची माहिती शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

या गुवाहाटी दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदे गुवाहाटीचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि पोलिस आयुक्तांना भेटणार आहेत. जून महिन्यात महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी घडल्या त्या काळात शिंदे यांना आसामच्या ज्या व्यक्तींनी मदत केली त्यांना भेटणार आहेत. या दौऱ्यात कामाख्या देवीच्या मंदिरात शिंदेंकडून विशेष पूजेचे नियोजन करण्यात आल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली आहे. आमदारांना एकत्रित बांधून ठेवण्यासाठी की रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार मार्गी लावण्यासाठी हा दौरा आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हे ही वाचा: Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

इच्छा पूर्ण झाल्यामुळे देवीच्या दर्शनाला जाणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं आहे. गुवाहाटीत 24 आणि 28 जून असे एकूण 2 वेळा एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदार यांच्यासोबत कामाख्या देवीचे दर्शणासाठी गेले होते. राज्यामध्ये सत्ता आली तर सर्वांना घेऊन दर्शनाला येईन,’ असा नवस ते बोलले होते. तो फेडण्यासाठी शिंदे आता गुवाहाटीला चालले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat Sleeper Train: आनंदाची बातमी! देशातील पहिली वंदे भारत स्लिपर ट्रेन रुळांवर लवकरच धावणार, अखेर रेल्वेकडून मान्यता

लोककल्याणाची गाथा आणि भक्तीचा वसा ! अभंग तुकाराम सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, या तारखेला रिलीज होणार सिनेमा

Justice Suryakant India’s New Chief Justice : न्यायमूर्ती सूर्यकांत असणार भारताचे नवे सरन्यायाधीश! राष्ट्रपतींनी केली नियुक्ती

Rohit Arya Encounter: 'बाथरुम'मधून पोलिस आत शिरले अन्.., कसा घडला किडनॅपरच्या एन्काऊंटरचा थरार?

Latest Marathi News Live Update : आरोग्य विभागाच्या शासकीय निधीत अपहार

SCROLL FOR NEXT