awas yojana Sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! स्वत:ची जागा नसल्याने ६०२० कुटुंबांना बांधता येईना मंजूर घरकुल; ५० हजारांचे वाढीव अनुदान मिळेना, पाऊण लाखांपैकी ७८२ लाभार्थींनाच मिळाली मोफत वाळू

सोलापूर जिल्ह्यातील एक लाख तीन हजार ३८९ बेघरांसाठी घरकुल मंजूर झाली आहेत. त्यापैकी ७७ हजार १७७ जणांना १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळाला आहे. पण, त्यापैकी सहा हजार २० लाभार्थ्यांकडे स्वत:ची २५ चौरस मीटरदेखील जागा नसल्याने त्यांना घराचे बांधकाम सुरू करता आलेले नाही.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील एक लाख तीन हजार ३८९ बेघरांसाठी घरकुल मंजूर झाली आहेत. त्यापैकी ७७ हजार १७७ जणांना १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळाला आहे. पण, त्यापैकी सहा हजार २० लाभार्थ्यांकडे स्वत:ची २५ चौरस मीटरदेखील जागा नसल्याने त्यांना घराचे बांधकाम सुरू करता आलेले नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी लँड बॅंक तयार करूनही जिल्ह्यात अशी स्थिती आहे.

मागील सात वर्षांत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ४१ हजार ३७४ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. पण, मंजूर झालेल्या लाभार्थ्यांपैकी ७७ हजार १७७ घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता वितरित झाला आहे. त्या सर्वांनीच शासनाच्या मोफत वाळूची मागणी नोंदविली आहे. परंतु, मोहोळ, करमाळा, पंढरपूर, मंगळवेढा व माळशिरस या पाच तालुक्यांमधील अवघ्या ७८२ लाभार्थ्यांनाच एक ते पाच ब्रास वाळू मिळाली आहे. उर्वरित बेघर लाभार्थ्यांना अजूनही मोफत वाळू मिळालेली नाही. दुसरीकडे, घरकुल लाभार्थ्यांना ५० हजार रुपये वाढीव अनुदान देण्याचा शासन निर्णय निघाला आहे. पण अजूनही वाढीव अनुदान मिळत नाही. त्यामुळे पहिला हप्ता घेऊनही अर्ध्या लाखाहून अधिक लाभार्थ्यांनी घरकुलांची कामे सुरू केलेली नाहीत.

अनुदानवाढ, सूर्यघर योजना जाहीर, पण...

राज्य सरकारने आवास योजनेच्या लाभार्थ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान वाढविले. त्यामध्ये ३५ हजार घरकुल बांधकामासाठी तर १५ हजार रुपये सौरऊर्जेच्या ‘सूर्यघर योजने’अंतर्गत सोलार पॅनेल बसविण्यासाठी देण्यात येणार आहेत. यामुळे लाभार्थ्यांना मोफत वीज मिळणार असून, ऊर्जा स्वावलंबन साधणे हा हेतू आहे. मात्र, अजूनही लाभार्थ्यांना ना वाढीव अनुदान ना सोलार पॅनेल मिळाले.

लाभार्थींना ‘मनरेगा’ची मजुरीही मिळेना

घरकुलाचा किमान आकार २५ चौरस मीटर आणि स्वयंपाकासाठी स्वतंत्र जागा असणे अपेक्षित आहे. घरकुल बांधकामासाठी एक लाख २० हजार रुपयांचे अनुदान मिळते आणि स्वच्छ भारत मिशनमधून शौचालयासाठी १२ हजार रुपये आणि ‘मनरेगा’तून मजुरीपोटी ९० दिवसांसाठी २८ हजार रुपये दिले जातात. मात्र, मजुरीचे पैसे सध्या मिळत नसल्याने लाभार्थ्यांनी घरकुलांची कामेच सुरू केलेली नाहीत.

सोलापूर जिल्ह्यातील घरकुलांची स्थिती

  • एकूण मंजुरी

  • १,०३,३८९

  • पहिला हप्ता दिलेले

  • ७७,१७७

  • जागा नसलेले लाभार्थी

  • ६,०२०

  • मोफत वाळू मागितलेले

  • ७७,८५३

  • वाळू मिळालेले

  • ७८२

  • पहिला हप्ता मिळूनही गप्प

  • ५७ हजारांपर्यंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission : ''या चुका होतात, हे सामान्य''; जिवंत लोकांना मृत दाखवल्याच्या दाव्यावर सुप्रीम कोर्टात ECIचं अजब उत्तर

Movie Poster Out : ‘अरण्य’मध्ये उलगडणार जंगल, भावना आणि संघर्षाची कहाणी; राणादाचा दमदार कमबॅक !

Latest Maharashtra News Updates Live: ठाणे पोलिसांची धडक मोहीम; तब्बल 32 कोटींच्या अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त

Angarki Chaturthi Modak Recipe: अंगारकी संकष्ट चतुर्थीला बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा खास उकडीचे आणि तळणीचे मोदक, लगेच नोट करा रेसिपी

जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा दिसणार 'अभंग तुकाराम’ मध्ये; कोण साकारणार मुख्य भूमिका?

SCROLL FOR NEXT