police ground exam sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापुरात पोलिस भरतीत ६३६० पदवीधर! ‘BA-MA, Bsc, B-com, बीटेक’चेच सर्वाधिक तरूण

पोलिस भरतीसाठी राज्यभरातून प्राप्त १८ लाख अर्जांमध्ये जवळपास साडेसहा लाख तरुण पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत. सोलापूर शहर आयुक्तालयातील चालकांच्या ७३ जागांसाठी तब्बल ३४३९ तरुण पदवी, पदव्युत्तर तर शिपाईच्या ९८ पदांसाठी २९२१ उमेदवार उच्चशिक्षित आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यात कोरोनानंतर बेरोजगारी वाढल्याची स्थिती समोर आली असून पोलिस भरतीसाठी राज्यभरातून प्राप्त १८ लाख अर्जांमध्ये जवळपास साडेसहा लाख तरुण पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत. सोलापूर शहर आयुक्तालयातील चालकांच्या ७३ जागांसाठी तब्बल तीन हजार ४३९ तरुण पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत. तर शिपाईच्या ९८ पदांसाठी दोन हजार ९२१ उमेदवार उच्चशिक्षित आहेत.

कला शाखेतून पदवी घेऊनही नोकरी न मिळालेले साडेतीन हजारांहून अधिक उमेदवार पोलिस भरतीतून नशीब आजमावत आहेत. तसेच या भरतीसाठी बीकॉम झालेले सव्वाआठशे तरुण आहेत. विशेष बाब म्हणजे पोलिस भरतीसाठी बीएससी, एमएससी, बी-टेक, एमसीए, एमकॉम झालेले तरुण-तरुणींनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. पोलिस भरतीच्या माध्यमातून शासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले आहे. बीएड, एमएसडब्ल्यू, इंजिनिअरिंग झालेले उमेदवार देखील पोलिस भरतीची तयारी करीत आहेत. त्यांनी पोलिस भरतीच्या अनुषंगाने लेखी परीक्षेचा चांगलाच अभ्यास केला आहे. आता मैदानी चाचणी यशस्वी झाल्यानंतर लेखी सहजपणे उत्तीर्ण होऊ, असा त्या उमेदवारांना विश्वास आहे.

सोलापूर पोलिस भरतीच्या ‘मैदानी’तील उमेदवार

  • बीए : ३,६२५

  • बीकॉम : ८२१

  • बीएससी : ६८८

  • एमए : ४०३

  • एमकॉम : १०६

  • एमएसडब्ल्यू : ३९

  • बीई : ६४

  • बीसीए : ४६

  • बी.टेक : २२

यंदा तरुणांना नोकरीची संधी

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्य सरकार शासकीय विभागातील ७५ हजार पदे भरली जाणार आहेत. आता पुढील महिन्यापासून त्याचे नियोजन कागदावर येईल आणि मार्चनंतर टप्प्याटप्प्याने भरती प्रक्रिया सुरु होईल. त्यामुळे तरुणांना त्याठिकाणी निश्चितपणे नोकरीची संधी मिळेल. पण, प्रत्येक भरतीसाठी जागांच्या तुलनेत उमेदवारांची संख्या दहापटीने जास्त असणार आहे. पोलिस भरतीच्या निमित्ताने राज्यातील सुशिक्षित बेरोजगारी समोर आली आहे. स्पर्धा मोठी असेल, पण जिद्द, चिकाटी व परिश्रमातून निश्चित यश मिळेल, असा विश्वास तरूणांनी बाळगावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Navi Mumbai: रिल्स बनवण्यासाठी रेल्वेवर चढला, इतक्यात ओव्हरहेड वायरला चिटकला अन्...; क्षणात आयुष्य उद्ध्वस्त

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT