Loan App Banned sakal
महाराष्ट्र बातम्या

69 Loan App Banned: कर्जाच्या वसुलीसाठी छळ; सरकारची गुगलला नोटीस

महाराष्ट्र सरकारच्या सायबर सेलने यासंदर्भातील नोटीस गुगलला दिली आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : कर्जासाठी छळ करणाऱ्या लोन अॅपवर महाराष्ट्र सरकारने कारवाईसाठी पावले उचलले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या सायबर सेलने यासंदर्भातील नोटीस गुगलला दिली आहे. त्यामधून सरकारने तब्बल 69 लोन अॅप हटवण्याचे आदेश दिले आहेत.

(69 Loan App Banned)

कोरोनाच्या काळात अशा लोन अॅपबद्दल साधारण एका हजारापेक्षा जास्त तक्रारी महाराष्ट्र सायबर सेलकडे आल्या होत्या. त्यातील चौकशीनंतर सायबर सेलने हा निर्णय घेत गुगलच्या अमेरिकेतील कार्यालयाला हे अॅप काढून टाकण्यासाठी नोटीस पाठवली आहे.

ग्राहकांची गोपनीय माहिती वापरून त्याचा गैरवापर केला जात असल्याचाही आरोप होत आहे. अशा अनेक तक्रारी कोरोनाच्या काळात केल्या गेल्या होत्या. या अॅपने होत असलेल्या छळामुळे काही लोकांनी आत्महत्या केल्याचंही समोर आलं होतं. त्यामुळे महाराष्ट्र सायबर सेलने यासंदर्भातील नोटीस गुगला पाठवली आहे. यामध्ये त्यांनी तब्बल 69 लोन अॅप बंद करण्याचे आदेश गुगलला दिले आहेत. या अॅपमध्ये कॅश अॅडव्हान्स, कोष, येस कॅश, हॅन्डी लोन, मोबाईल कॅश या अॅपचाही सामावेश आहे.

कोरोनाकाळात बेरोजगारी निर्माण झाल्याने लोकांना पैशांची उणीव भासू लागली होती. त्यानंतर या लोन अॅपमधून अनेकांनी लोन काढले होते. पण लोन परत करण्यासाठी अनेकांना छळाला सामोरे जावे लागले होते. अशा अनेक तक्रारी आल्याने सायबर सेलने यासाठी पावले उचलली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सख्खे भाऊ, सख्खे व्याही! पाकच्या लष्करप्रमुखांनी लेकीचं लग्न भावाच्या मुलाशी लावून दिलं, लष्कराच्या मुख्यालयात लग्नसोहळा

Kolhapur Political News : घराणेशाहीला विरोध करणाऱ्या महायुतीकडूनच नेत्यांच्या वारसांना प्राधान्य, कोल्हापूरकरांची भूमिका काय?

Latest Marathi News Update : नागपूरात भाजपच्या उमेदवारी यादीत घराणेशाहीची छाया

Gold Silver Price Today : वर्षाच्या शेवटी सोने, चांदीचा दरात घसरण होणार!, चांदी वाढली सोने दरात घट...

Bhandup BEST Accident : भाजी कोणती आणू? पतीनं फोनवरून विचारलं, पत्नीचं उत्तर ऐकण्याआधीच गेला जीव

SCROLL FOR NEXT