74 lakh gold hidden in underwear seized at pune Airport 
महाराष्ट्र बातम्या

पुणे : अंडरवेअरमध्ये लपवलेले ७४ लाखाचे सोने लोहगाव विमानतळावर जप्त

सकाळ वृत्तसेवा

पुणे : दुबईहून आलेल्या विमानातून तस्करीच्या उद्देशाने एका प्रवाशाने आणलेले 74 लाख रुपये किमतीचे पेस्ट स्वरूपातील सोने सीमाशुल्क विभागाच्या पथकाने जप्त केले. शनिवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा, ई-सकाळचे ऍप

पेनकर जुहेर झाहीद (रा. म्हासाला, रायगड) असे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या प्रवाशाचे नाव आहे. झाहीद हा शनिवारी पहाटे चारच्या सुमारास दुबईहून आलेल्या स्पाइस जेट या विमानातून आला. त्या वेळी सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रवाशांची तपासणी केली जात होती. त्या वेळी त्याच्या जीन्स पॅंटच्या अंतर्गत खिशांमध्ये एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पेस्ट स्वरूपातील सोने आढळले. तर दुसरी प्लॅस्टिकची पिशवी त्याने अंतर्वस्त्रामध्ये ठेवली होती. असे एकूण 2196 ग्रॅम वजनाचे 74 लाख 41 हजार रुपये किमतीचे सोने अधिकाऱ्यांनी त्याच्याकडून जप्त केले.

या मलाईदार खात्याच्या वाटाघाटीमुळे अडलंय महाविकासआघाडीचं खातेवाटप

सीमाशुल्क विभागाच्या सहआयुक्त वैशाली पतंगे, पुणे विभागाच्या सीमाशुल्कचे उपायुक्त मोतीलाल शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली माधव पळनीटकर व प्रतिभा माडवी यांच्या पथकाने ही कारवाई केली. झाहीदविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SMAT 2025: इशान किशनच्या झारखंडने जिंकली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी; पुण्यात झालेल्या फायनलमध्ये कर्णधार ठरला हिरो

Nitish Kumar Hijab Incident : हिजाब घटनेनंतर नितीश कुमारांच्या जीवाला धोका? ; यंत्रणांनी सुरक्षा वाढवली!

Crime: भयंकर! ४० वर्षीय प्रेयसीला २७ वर्षीय प्रियकराकडून मूल हवं होतं; तरुणाच्या पत्नीला कळलं अन् भलतंच कांड घडलं!

Latest Marathi News Live Update : ‘जी राम जी’वर लोकसभेची मोहोर ; रोजगारवाढीचा केंद्र सरकारचा दावा

Viral Video Fact Check: बेघर होऊन भीक मागताना सापडलेली महिला खरंच क्रिकेटर सलीम दुर्रानी यांची पत्नी? काय आहे सत्य?

SCROLL FOR NEXT