Strike esakal
महाराष्ट्र बातम्या

Protest News : राज्यातील 74 हजार आशा व गटप्रवर्तक आजपासून संपावर; चर्चा निष्फळ

सकाळ वृत्तसेवा

Protest News : गट प्रवर्तक व आशा यांना आरोग्य विभागाकडून ऑनलाइन कामे सांगणे बंद करावे, यासह प्रलंबित मागण्यांसाठी राज्य आरोग्य खाते, आशा गट प्रवर्तक संघटना, आयटक कृती समिती शिष्टमंडळ व आरोग्य विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांच्यात मुंबईत झालेली बैठक निष्फळ ठरली आहे.

कोणताही तोडगा न निघाल्याने कृती समिती कामबंद संपावर कायम आहे. बुधवार (ता. १८)पासून राज्यातील ७० हजार आशा; तर चार हजार गटप्रवर्तक संपावर जाणार असल्याचे समितीचे राजू देसले यांनी सांगितले. यात नाशिक जिल्ह्यातील तीन हजार ६७२ आशा व २३० गटप्रवर्तकांचा समावेश आहे. (74 thousand Asha and group promoters in state are on strike from today nashik news)

राज्य आरोग्य खाते, आशा गट प्रवर्तक संघटना, आयटक कृती समितीने निवेदन देत मागण्या शासनाला कळविल्या होत्या. प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कृती समितीतर्फे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा परिषदेसमोर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन करण्यात आले. मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी राज्याचे आरोग्य प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांच्या दालनात सोमवारी (ता. १६) उशिरा कृती समिती पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाबरोबर बैठक झाली.

या वेळी आरोग्य सहसंचालक सुभाष बोरकर उपस्थित होते. गट प्रवर्तकांना शासकीय सेवेत कायम करा, आशा ऑनलाइन काम करणार नाही, दीपावलीचा बोनस द्या, गट प्रवर्तक यांना सुपरवायझर म्हणून ओळख द्या, २०१८ पासून केंद्र सरकारने आशा गट प्रवर्तकना मोबदला वाढ केली नाही, ती तत्काळ करावी, आशा गट प्रवर्तकना किमान वेतन लागू करा, आशा गट प्रवर्तकच्या कामाचे मूल्यमापन करावे, शहरी आशांना संपूर्ण मोबदला द्या आदी प्रश्नांवर बैठकीत चर्चा झाली.

बैठकीत प्रधान सचिव म्हैसकर यांनी वरील प्रश्नांवर लवकरच मंत्रिमहोदयांबरोबर बैठक घेतली जाईल, असे आश्वासन दिले. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीतही मंत्रिमहोदयांबरोबर बैठकीचे आश्वासन दिले गेले होते. प्रत्यक्षात अद्यापही बैठक झालेली नाही. त्यामुळे बुधवारपासून संपावर जाणार असल्याचे देसले यांनी जाहीर केले.

राज्यातील ७० हजार आशा, चार हजार गट प्रवर्तक संपात सहभागी होतील. प्रलंबित मागण्या त्वरित मान्य कराव्यात अशी मागणी कृती समितीचे राजू देसले, राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, आरोग्य खाते, आशा गट प्रवर्तक संघटना (आयटक), आनंदी अवघडे, एम. ए. पाटील, शंकर पुजारी, नेत्रदीपा पाटील, मनीषा खैरनार, शुभा शमीम, पुष्पा पाटील आदींनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शक्तीचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका नाही, पण मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता; IMDने दिला इशारा

Crime News: अमेरिकेतील डल्लासमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या; हैदराबादच्या चंद्रशेखर पोलच्या मृत्यूने भारतात हळहळ

Latest Marathi News Live Update: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अहिल्यानगर दौऱ्यावर

Sakal Premier League : 5 नोव्हेंबरपासून 'सकाळ प्रिमिअर लीग'चा थरार; विजेत्या संघाला तीन लाखांचा पुरस्कार, ३२ संघ होणार सहभागी

PMC Elections : कोठे तक्रारींची दखल; कोठे राजकीय सोय, अंतिम प्रभागरचना जाहीर; इच्छुकांच्या नजरा आरक्षणाच्या सोडतीकडे

SCROLL FOR NEXT