Devendra Fadanvis  sakal
महाराष्ट्र बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमातील 80000 घरकुले थांबलेलीच! ग्रामविकास मंत्र्यांच्या जिल्ह्यासह ‘हे’ जिल्हे पिछाडीवर; ना मोफत वाळू ना वाढीव अनुदान

मुख्यमंत्र्याच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत राज्यात १०० दिवसांत एक लाख ६० हजार ५४४ घरकुलांची कामे पूर्ण करण्याचे जिल्हानिहाय उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सातारा जिल्ह्यासह राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये उद्दिष्टाच्या ५० टक्के सुद्धा कामे पूर्ण झाली नाहीत.

तात्या लांडगे

सोलापूर : मुख्यमंत्र्याच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत राज्यात १०० दिवसांत एक लाख ६० हजार ५४४ घरकुलांची कामे पूर्ण करण्याचे जिल्हानिहाय उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सातारा जिल्ह्यासह राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये उद्दिष्टाच्या ५० टक्के सुद्धा कामे पूर्ण झाली नाहीत. १०० दिवसांत राज्यात ७९ हजार घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत.

महायुती सरकारला १०० दिवस पूर्ण होण्यापूर्वी विविध विभागांना कामांचे उद्दिष्ट देऊन ते पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. सातारा जिल्ह्यात १०० दिवसांत ९४२ घरकुलांची कामे पूर्ण होणे अपेक्षित होती, पण २ एप्रिलपर्यंत अवघी ४३० घरकुले पूर्ण झाली आहेत. जिल्हा दरसुचीनुसार (डीएसआर) २६९ चौरस फुटाच्या घरकूल बांधकामासाठी दोन लाख २५ हजार रुपये लागतात. पण, सध्या आवास योजनेतील लाभार्थींना एक लाख २० हजार रुपयांचेच अनुदान मिळते. दुसरीकडे वाळू लिलाव बंद आणि सुधारित वाळू धोरण अजूनही अंतिम न झाल्याने बेघर लाभार्थींना घरकुल बांधकामासाठी मोफत वाळू देखील मिळत नाही. त्यामुळे पहिला हप्ता मिळूनही ३० हजारांहून अधिक लाभार्थींनी घरांचे कामच सुरू केलेले नाही.

‘या’ १५ जिल्ह्यांची सुमार कामगिरी

छत्रपती संभाजीनगर (४७ टक्के), सातारा (४६ टक्के), चंद्रपूर (४४ टक्के), ठाणे (४३ टक्के), सोलापूर (४३ टक्के), जालना (३८ टक्के), पुणे (३७ टक्के), कोल्हापूर (३६ टक्के), धुळे (३० टक्के), नाशिक (३० टक्के), नांदेड (२९ टक्के), अहिल्यानगर (२७ टक्के), यवतमाळ (२५ टक्के), पालघर (१२ टक्के), नंदुरबार (८ टक्के).

उद्दिष्टपूर्तीसाठी दररोज आढावा

सोलापूर जिल्ह्यातील तीन हजार ५५८ बेघर लाभार्थींनी १०० दिवसांत घरकूल बांधून पूर्ण करणे अपेक्षित असून आतापर्यंत दीड हजार लाभार्थींची घरे पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यातील ६२ हजार घरकुलांना मंजुरी दिली असून त्यांची कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने दररोज व दर आठवड्याला आढावा घेतल जातोय.

- रतीलाल साळुंखे, समन्वयक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सोलापूर

घरांची विभागनिहाय स्थिती

  • विभाग उद्दिष्ट कामगिरी

  • नागपूर २०,१९५ १३,९८८

  • छ.संभाजीनगर ४३,३०३ २४,६४०

  • अमरावती २९,९६२ १५,१३८

  • पुणे ९,७७८ ४,१०४

  • कोकण १०,४२७ ४,१०२

  • नाशिक ४६,८७९ १६,६१३

  • एकूण १,६०,५४४ ७८,५८५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताने Asia Cup जिंकल्यानंतर पाकिस्तानमध्ये अफगाणी विद्यार्थ्याने दिल्या 'जय हिंद'च्या घोषणा! Video Viral

JNU Ravan Dahan controversy : उमर खालिद अन् शरजीलचे फोटो पुतळ्यावर लावून 'जेएनयू'मध्ये झाले रावणाचे दहन!

Uddhav Thackeray: राज ठाकरेंसोबत युती आहे की नाही? दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर देत विषयच संपवला, म्हणाले...

World Cup 2025: पाकिस्तानची पहिल्याच सामन्यात दयनीय अवस्था! आधी १२९ वर ऑलआऊट केलं अन् मग बांगालादेशनं गोलंदाजांनाही झोडलं

Talegaon Dhamdhere News : आठवीत शिकणाऱ्या शेतमजुराच्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT