Amravati students get food poisoning esakal
महाराष्ट्र बातम्या

Food Infection : शिर्डीत सहलीला गेलेल्या 88 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; उलटीचा होऊ लागला त्रास

पंढरपुरातील (Pandharpur) घटना ताजी असतानाच, आता शिर्डीतून (Shirdi) एक धक्कादायक बातमी समोर आलीये.

सकाळ डिजिटल टीम

सहलीच्या ठिकाणी जेवण केल्यानंतर मुलांची प्रकृती बिघडली. काल रात्री जेवण केल्यानंतर 88 विद्यार्थ्यांना उलटी आणि मळमळचा त्रास होऊ लागला होता.

अहमदनगर : पंढरपुरातील (Pandharpur) घटना ताजी असतानाच, आता शिर्डीतून (Shirdi) एक धक्कादायक बातमी समोर आलीये. अमरावतीहून (Amravati) शिर्डीत आलेल्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती आहे.

काल रात्री जेवणानंतर अचानक उलटी आणि मळमळीचा त्रास सुरू झाल्यानं विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यात जवळपास 88 जणांना अन्नातून विषबाधा झाल्याचं समोर आलंय.

विद्यार्थ्यांवर शिर्डीतील साईनाथ रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीतील दर्यापूर तालुक्याच्या (Daryapur Taluka) आदर्श हायस्कूलची शिर्डीला सहल आली होती. इयत्ता चौथी ते सहावीचे एकूण 230 विद्यार्थी सहलीला आले होते.

या विद्यार्थ्यांची शाळेनं नेवासा इथं थांबण्याची व्यवस्था केली होती. सहलीच्या ठिकाणी जेवण केल्यानंतर मुलांची प्रकृती बिघडली. काल रात्री जेवण केल्यानंतर 88 विद्यार्थ्यांना उलटी आणि मळमळचा त्रास होऊ लागला होता. दरम्यान, सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डाॅ. प्रितम वडगावे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

Success Story: शेतकरी कुटुंबातील मुलाची 'एनडीएत' भरारी; अमेय साळुंखेंचा देशात 34 वा क्रमांक, लहानपणीच पितृछत्र हरपलं, आईने कष्टाने वाढवलं..

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

SCROLL FOR NEXT