sakal-exclusive sakal
महाराष्ट्र बातम्या

सहा महिन्यात रोखले ८९९ बालविवाह! पालकांच्या मनात असुरक्षिततेची भीती; गुपचूप विवाह होण्याचे प्रमाणही अधिक

राज्यातील बालसंरक्षण समित्यांनी जानेवारी ते जून २०२३ या सहा महिन्यात तब्बल ८९९ बालविवाह रोखल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुपचूप उरकलेल्या बालविवाहांची संख्या अधिक असू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : मुली पळून जाणे, हुंडा देण्याची ऐपत नाही, वय वाढल्यानंतर मुलीला चांगला पती मिळणार नाही, उच्चशिक्षणानंतरही नोकरीची शाश्वती नाही, अशा प्रमुख कारणांमुळे राज्यात बालविवाहाची प्रथा रूजू लागली आहे. राज्यातील बालसंरक्षण समित्यांनी जानेवारी ते जून २०२३ या सहा महिन्यात तब्बल ८९९ बालविवाह रोखल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुपचूप उरकलेल्या बालविवाहांची संख्या अधिक असू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

कायद्याने मुलीचे वय १८ तर मुलाचे वय २१ पूर्ण झाल्याशिवाय विवाह करणे गुन्हा आहे. तरीपण, राज्यात कायद्याला पायदळी तुडवून बालविवाह उरकले जात आहेत. बालविवाह रोखण्यासाठी गाव पातळीवर, तालुका व जिल्हा स्तरावर अनेक समित्या कार्यरत असतानाही तसे प्रकार वाढत आहेत हे विशेष. तंत्रज्ञानाच्या जमान्यात प्रत्येकाच्या हाती आता ॲन्ड्राईड फोन आल्याने एकमेकांशी संपर्क अगदी सोपा झाला आहे.

राज्यात मुली बेपत्ता किंवा अल्पवयीन मुलीला फूस लावून तिचे अपहरण होण्याचे प्रकार वाढले आहेत. अजूनही अनेक मुलींचा शोध लागलेला नाही. याची भीती पालकांच्या मनात असल्याने मुलीचे वय १८ होण्यापूर्वीच विवाह लावून देत आहेत. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात त्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयातील मुलींचे प्रमाण कमी होत असल्याचेही चित्र आहे

सहा महिन्यात रोखलेले बालविवाह

  • महिना बालविवाह

  • जानेवारी ४६

  • फेब्रुवारी ९०

  • मार्च १५४

  • एप्रिल १५९

  • मे २९४

  • जून १५६

  • एकूण ८९९

बालविवाह मुलीच्या भविष्यासाठी धोकादायकच

मुलीची शारीरिक वाढ पूर्ण होण्यापूर्वीच तिच्यावर मातृत्व लादले जात आहे. मुलीचे वय १८ पूर्ण होण्यापूर्वीच विवाह लावून देण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जे वय तिचे खेळण्या-बागडण्याचे असते, त्या वयात ती एक-दोन मुलांची आई होत आहे. त्यामुळे त्या मुलीला आरोग्याच्या भयानक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे कमी वयात विवाह झाल्याने तिला नात्यांची एवढी जाण नसते. त्यामुळे तिला कौटुंबिक छळ किंवा त्रासाला सामोरे जावे लागते. पालकांनीही त्याचा विचार गांभीर्याने करण्याची गरज आहे.

बालविवाहाची प्रमुख कारणे...

  • १) उच्च शिक्षण घेण्यासारखी कौटुंबिक परिस्थिती नाही

  • २) मुली पळून जाण्याचे प्रमाण वाढल्याने पालकांमध्ये असुरक्षिततेची भीती

  • ३) उच्च शिक्षणानंतरही पालकांना नोकरीची शाश्वती वाटत नाही

  • ४) नवतंत्रज्ञानाच्या जमान्यात स्मार्टफोनची पालकांना वाटतेय भीती

  • ५) मुलीचे वय वाढल्यानंतर विवाहाची चिंता; कमी हुंडा देऊन लवकर विवाह उरकण्याची घाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT