schools sakal
महाराष्ट्र बातम्या

‘आरटीई’ प्रवेशाच्या एक किमी अंतराचा घोळ! शाळेपासून नव्हे विद्यार्थ्याच्या घरापासून अंतर नाहीच; शासनाच्या नवीन बदलात मोठी त्रुटी

‘आरटीई’नुसार विद्यार्थ्याच्या घरापासून एक किमी अंतरावरील शाळांमध्ये प्रवेश आवश्यक आहेत. पण नवीन बदलानुसार विद्यार्थ्याच्या घरापासून अर्धा किमी अंतरावर खासगी इंग्रजी माध्यमाची शाळा असेल आणि तेथून एक किमी अंतरावर शासकीय शाळा असल्यास त्याठिकाणी प्रवेश घ्यावा लागणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : ‘आरटीई’नुसार विद्यार्थ्याच्या घरापासून एक किमी अंतरावरील शाळांमध्ये प्रवेश आवश्यक आहेत. पण, नवीन बदलानुसार विद्यार्थ्याच्या घरापासून अर्धा किमी अंतरावर खासगी इंग्रजी माध्यमाची शाळा असेल आणि तेथून एक किमी अंतरावर शासकीय शाळा असल्यास त्याठिकाणी प्रवेश घ्यावा लागणार आहे.

राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील एक लाख १० हजार विद्यार्थ्यांना दरवर्षी खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शासनातर्फे मोफत प्रवेश दिला जात होता. त्यासाठी दरवर्षी सरकारी तिजोरीतून ८०० ते ९०० कोटी रूपयांचे शुल्क खासगी इंग्रजी शाळांना द्यावे लागत होते. अद्याप राज्यातील इंग्रजी शाळांचे दीड हजार कोटी रूपये शासनाकडे प्रलंबित आहेत.

मराठी शाळांना घरघर लागलेली असताना इंग्रजी शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याच्या ‘आरटीई’ कायद्यातच आता दुरूस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पालकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. दरम्यान, आता शासनाने केलेल्या बदलात पुन्हा दुरूस्ती करावी लागणार आहे. तत्पूर्वी, शाळांचे मॅपिंग होईल आणि त्यानंतर ‘एनआयसी’च्या माध्यमातून प्रवेशाचे स्वॉप्टवेअर तयार केले जाईल. मार्च महिन्यातच ‘आरटीई’ प्रवेशाला सुरवात होईल, असे शालेय शिक्षण विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

८२ हजार शाळांचे मॅपिंग होणार

शालेय शिक्षण विभागाअंतर्गत जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांसह खासगी अनुदानित व विनाअनुदानित, अंशत: अनुदानित शाळांची संख्या ८२ हजारांवर आहे. नवीन बदलानुसार ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी या सर्वच शाळांचे मॅपिंग करावे लागणार आहे. ‘एनआयसी’च्या माध्यमातून ते काम होणार आहे. मॅपिंग पूर्ण झाल्यावर कोणत्या विद्यार्थ्याच्या घरापासून एक किमी अंतरावर शासकीय शाळा नाहीत हे स्पष्ट होणार आहे.

नवीन बदलात अशी होणार दुरूस्ती

‘आरटीई’तील बदलानुसार सध्या खासगी किंवा विनाअनुदानित शाळेपासून एक किमी अंतरावरील शासकीय, अनुदानित, अंशत: अनुदानित शाळांमध्ये प्रवेश दिला जाईल, असे शासनाने स्पष्ट केले आहे. पण, शाळेपासून नव्हे तर विद्यार्थ्याच्या घरापासून एक किमी असे असायला हवे. शाळेपासून म्हटल्यास विद्यार्थ्याचे घर शासकीय शाळापासून दीड-दोन किमी अंतरावर असू शकते. त्यामुळे ‘आरटीई’चे उल्लंघन होईल. या पार्श्वभूमीवर आता ‘शाळेपासून नव्हे तर विद्यार्थ्याच्या घरापासून एक किमी अंतरावरील शाळा’ असा बदल केला जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : ज्वेलर्सचे सुरक्षा रक्षक भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT