महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा एक निर्णय अन् स्मारकातील १२५ झाडांची कत्तल थांबली

डिझाईन बदलामुळे प्रकल्पाचा कालावधी अडीच महिन्यांनी वाढला

किरण कारंडे

हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकासाठी उद्धव ठाकरे यांच्या एका निर्णयामुळे एकाच झटक्यात १२५ झाडांची वृक्षतोड थांबवण्याचा निर्णय झाला. या निर्णयामुळे प्रकल्पाचा कालावधी अडीच महिन्यांनी वाढला खरा, पण स्मारकासाठी वृक्षतोड नको या निर्णयावर मात्र उद्धव ठाकरेंनी भूमिका घेतल्याने या संपूर्ण स्मारकाच्या ठिकाणी एकही झाडाची वृक्षतोड झाली नाही. महत्वाचे म्हणजे हेरीटेज वारसा असलेल्या वास्तुमध्ये भूमीगत बांधकामाच्या संकल्पेला यामुळे बळ मिळाले.

स्मारकाच्या प्रकल्पाच्या डिझाईनमध्ये सुरूवातीला १२५ झाडांचे पुर्नरोपण किंवा छाटणी करण्याचे प्रस्तावित होते. परंतु स्मारकासाठी पुर्नरोपणाच्या पद्धतीला उद्धव ठाकरे यांनी विरोध केला. त्यामुळेच नव्याने स्मारकासाठीचे डिझाईन करण्याची वेळ ही आर्किटेक्टवर आली. या सगळ्या प्रक्रियेत नव्या डिझाईनसाठी प्रल्पाचा कालावधी हा आणखी अडीच महिन्यांनी वाढल्याची माहिती शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दिली. कोविडचा कालावधी, पावसाळ्यातील आव्हानात्मक स्थिती अशा अनेक संकटांना सामोरे जात या प्रकल्पाचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी स्मारकाच्या कामाच्या निमित्ताने माध्यमांशी साधलेल्या संवादातही या स्मारकासाठी कशा पद्धतीने परवानग्या मिळवतानाच हेरीटेज वास्तुचा दर्जा कायम राखण्यासाठी कोणतीही तडजोड किंवा डिझाईनमध्ये बदल केले नसल्याचे सांगितले. या संपूर्ण स्मारकाच्या डिझाईनमध्ये एकही झाड न कापता भूमीगत डिझाईनसाठी आम्ही आग्रह धरला. त्यानुसारच महापौर बंगल्याच्या वास्तुला कोणताही धक्का न लागू देता आम्हाला आभा लांबा यांनी दिलेले डिझाईन सर्वाधिक आवडले. स्मारकाच्या वास्तुसाठी थोडा वेळ लागतो आहे, पण हे स्मारक नसून एक प्रेरणास्थान असेल अशीही ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

स्मारकाला अगदी लागूनच समुद्र किनारा आहे. या किनाऱ्याच्या ठिकाणी समुद्राच्या पाण्याचे लागणारे धक्के हे भूमीगत वास्तु उभारण्यासाठीचे एक महत्वाचे आव्हान होते. पण वास्तुला या धक्क्यांपासून वाचवण्यासाठीच दोन पद्धतीच्या आरसीसीच्या भींती बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे समुद्राच्या धडकणाऱ्या पाण्यापासून वास्तुचा बचाव होईल. एम ६० या सर्वोच्च ग्रेडच्या सिमेंटचा आम्ही वापर केला आहे. तसेच जुने शहाबादी पद्धतीचे दगडांचे बांधकाम या वास्तुच्या निमित्ताने करण्यात आले आहे. त्यामुळे केमिकलच्या मर्यादांच्या तुलनेत पाण्याच्या धक्क्यांच्या संपर्कातही वास्तुची मजबुती अधिक काळ राहील असा आमचा विश्वास आहे. महत्वाचे म्हणजे २६ जुलैसारख्या अतिवृष्टीच्या आणि पाणी साचण्याच्या आव्हानातही या वास्तुवर कोणताही परिणाम होणार नाही अशा पद्धतीचे बांधकाम यासाठी करण्यात आले आहे. त्यामुळे पूरपरिस्थितीतही वास्तु मजबुत आणि शाबूत राहील याची काळजी घेण्यात आल्याची माहिती टाटा प्रोजेक्ट लिमिटेडच्या अधिकाऱ्याने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांचं वजन ९ किलो घटलं, उपोषणाचे अवयवांवर गंभीर परिणाम; प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिला इशारा

Pandharpur VIP Darshan : पहिल्याच दिवशी VIP दर्शन बंदीचा फज्जा! मुनगंटीवारांना ठेवलं वेटिंगवर, गुलाबराव पाटलांना दिलं तात्काळ दर्शन; महायुतीच्या नेत्यांमध्येच दुजाभाव?

Latest Marathi News Live Update : पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरात व्हीआयपी दर्शन घेतल्यास गुन्हा दाखल करणार

डॉक्टर पतीला संपवलं, ८ वर्षांचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात; शेजारी डॉक्टर पत्नी मोबाईल बघत बसलेली

'आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला' उर्मिला आणि आदिनाथ कोठारे यांचा घटस्फोट, पोस्ट शेअर करत म्हणाले...

SCROLL FOR NEXT