aamir Khan
aamir Khan Team eSakal
महाराष्ट्र

आमीर खान आता 'सोयाबीन' उत्पादनासाठी करणार काम

सकाळ डिजिटल टीम

राज्यातील दुष्काळ निवारणासाठी मोठं काम करणाऱ्या अभिनेता अमीर खानच्या पाणी फाऊंडेशन या संस्थेनं आता सोयाबीन वाढीसाठी काम करण्याचं ठरवलंय. सोयाबीन कसं पेरावं, उत्पादन कसं वाढवावं यांसारख्या गोष्टींपासून संपूर्ण शेती कशी करावी यासाठी ऑनलाईन सोयाबीन शाळा सुरू करण्याचं काम पाणी फाऊंडेशन केली आहे. पाणी फाउंडेशनच्या तज्ज्ञांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत नव्या सोयाबीन ची उभारणी कशी करावी यासाठी ऑनलाईन पुस्तिका ही तयार केली आहे.

अमीर खान यांनी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांची भेट घेत या पुस्तिकेचा शुभारंभ केला. ज्या शेतकऱ्यांना या ऑनलाईन शाळेत सहभागी व्हायचं असेल, त्यांना एक ऑनलाइन फॉर्म भरण्यास सांगण्यात आलं होतं. तब्बल ४६,३२७ शेतकऱ्यांनी या शेतीशाळेसाठी फॉर्म भरला होता. महाराष्ट्रातील ३६ जिल्हे आणि २५५ तालुक्यातील लोकांचा यामध्ये समावेश होता. राज्यासह गुजरात, कर्नाटक व आंध्र प्रदेशमधील मराठी भाषिकांनी देखील या ऑनलाईन शाळेत नोंदणी केली. शेतकऱ्यांना येणाऱ्या काळात या अभियानाचा नक्कीच फायदा होईल असा विश्वास अमीर खान यांनी व्यक्त केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT