Mumbai University Election  esakal
महाराष्ट्र बातम्या

Mumbai University Election : मुंबई विद्यापीठ निवडणुकीत ठाकरेंना बसू शकतो फटका; 'या' नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

संतोष कानडे

Mumbai University Election : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकांना सरकारने स्थगिती दिली आहे. या निवडणुकीसाठी मनसे आणि ठाकरे गटाने मोठी तयारी केली होती. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या निवडणुकीसाठी थेट मैदानात उतरले होते.

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीमधला एक वजनदार नेता आज ठाकरेंना सोडून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दाखल झालेला आहे. त्या नेत्याचं नाव आहे प्रवीण पाटकर. प्रवीण पाटकर हे आदित्य ठाकरेंचे अत्यंत जवळचे समजले जात होते. परंतु त्यांनी आज एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारत शिवसेनेत प्रवेश केला.

प्रवीण पाटकर यांच्या पक्षप्रवेशामुळे ठाकरेंना सिनेट निवडणुकांमध्ये मोठा फटका बसू शकतो. सिनेट निवडणुकांमध्ये प्रवीण पाटकर यांनी मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी केली होती याचा फायदा शिवसेनेला मागच्या सिनेट निवडणुकीत झाला होता. युवा सेनेतील अंतर्गत कलहा मुळेच प्रवीण पाटकर यांनी ठाकरेंना सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे सांगितले जात आहे. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पाटकर यांनी प्रवेश केला.

विद्यापीठाने जाहीर केलेली निवडणूक येत्या १० सप्टेंबरला होणार होती. या निडणुकीसाठी ठाकरे आणि मनसेने चांगली तयारी केली होती. मात्र रातोरात पत्रक काढून निवडणूक स्थगित केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी वाढली आहे.

अमित ठाकरे यांचीही ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाचीही कसोटी लागणार होती. मात्र, विद्यापीठाने निवडणुकीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थी संघटनेत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. भाजप-शिंदे गटातील तयारी अपूरी पडल्यामुळे हा निर्णय झाला का?, अशी चर्चा रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mehbooba Mufti: जम्मू काश्मीर भरताचाच अविभाज्य भाग म्हटलेल्या अमेरिकेच्या राजदूतांवर महबूबा मुफ्ती नाराज, स्पष्ट शब्दांत म्हणाल्या...

Pimpalvandi Protest: पिंपळवंडीतील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ जनसागर उसळला; नराधमाला २० दिवसांत फाशीची जोरदार मागणी

Mahagaon Rural Hospital: ‘सकाळ’च्या पाठपुराव्याला यश; महागाव ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांसह पाच अतिरिक्त कर्मचाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती

Pune Civic Politics: बालवडकरांनंतर टिंगरेंवरही भाजपचा रोष; पत्रप्रकरणातून राष्ट्रवादी-भाजप संघर्षाला पुण्यात नवे चिघळले रूप

Parenting Truth : आई-वडिलांना खरंच एखादं मूल जास्त आवडतं का? संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती

SCROLL FOR NEXT