Maratha Reservation Protest 
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation Protest: लाज असेल तर राजीनामा द्यावा, आदित्य ठाकरेंची आक्रमक मागणी

Sandip Kapde

Maratha Reservation Protest: जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु होते. लाठीमारात अनेक लोक आणि पोलीस जखमी झाले आहेत. दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

मुंबईतून आदेश आल्यावरच लाठीचार्ज झाल्याचा आरोप विरोधक करत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल अंतरवली येथे जाऊन आंदोलकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

दरम्यान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत. "जालन्यात जे घडले ते आपण सर्वांनी पाहिले आहे. लाठीचार्ज खूप क्रूर होता जणू काही तुम्ही तुमच्या शत्रूवर हल्ला करत आहात. आंदोलक संवेदनशील मुद्यांवर आंदोलन करत होते. मुख्यमंत्र्यांना न सांगता पोलिस लाठीमार करतील हे शक्य नाही. राज्य सरकारला थोडी लाज असेल तर राजीनामा द्यावा", अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतरही जालना हिंसाचारावर रविवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बंदची घोषणा करण्यात आली. जालन्यात मराठा आरक्षणादरम्यान झालेल्या लाठीचार्जनंतर आतापर्यंत १९ एसटी बसेसची तोडफोड करण्यात आली आहे.

जालना, लातूर, संभाजीनगर, धाराशिव जिल्ह्यात एसटी बसेसची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. तोडफोडीमुळे एसटी महामंडळाचे आतापर्यंत चार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचवेळी जालना एसपी तुषार दोसी यांना रजेवर पाठवण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचारानंतर त्यांना रजेवर पाठवण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

SCROLL FOR NEXT