aaditya thackeray 
महाराष्ट्र बातम्या

आदित्य यांनी घेतला ‘शिवालया’चा ताबा

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - राज्यात महाविकास आघाडी सरकारची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे शासकीय कामकाजात सक्रिय झाले आहेत. राज्यभरातून येणाऱ्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून आदित्य यांनी मंत्रालयासमोरील शिवालय या पक्ष कार्यालयाचाही ताबा घेतला आहे.

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले असून, सध्या ४२ मंत्री कार्यरत झाले आहेत. मंत्र्यांना खात्यांचे वाटप झाले नसले, तरी मंत्रालयातील दालनांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे कालपासूनच मंत्रालयात गर्दी वाढली आहे. शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांना मंत्रालयात सातव्या मजल्यावर दालन मिळाले आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा आणि आदित्य ठाकरे यांनादेखील कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने राज्यभरातील शिवसैनिकांची मंत्रालयात गर्दी वाढली आहे.

राज्यातून मंत्रालयात येणाऱ्यांसाठी प्रवेश पास घेणे बंधनकारक आहे. मात्र, मंत्रालयात दुपारी २ ते ५ वाजेपर्यंतच पास देण्याची सुविधा असल्याने उशिरा येणाऱ्यांना प्रवेश मिळत नाही. तसेच मंत्रालयातील गर्दीमुळे आदित्य ठाकरे यांची भेट मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे जनतेला भेटण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी दुसरा पर्याय स्वीकारला आहे.

मंत्रालयाच्या समोर मंत्र्यांसाठी असलेल्या बंगल्यापैकी एक बंगला पक्ष कार्यालयासाठी शिवसनेने मिळवला आहे. याला ‘शिवालय’ असे नाव देण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांनी या कार्यालयाचा ताबा घेतला असून, ज्यांना मंत्रालयात भेट घेता येत नाही, त्यांनी ‘शिवालया’त येण्याचे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC Election: एकनाथ शिंदे विधान परिषदेवर कोणाला पाठवणार? शिवसेनेच्या २ महिला चेहऱ्यांमध्ये जबरदस्त टक्कर; कुणाची लॉटरी लागणार?

पत्नीला पळवलं; नंतर आक्षेपार्ह फोटो काढून तिच्या पतीला पाठवले, स्वयंघोषित गुंडाचं धक्कादायक कृत्य

Pune Crime: पुणे विमानतळावर २६.८० कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त; एकाला अटक, चिनी बनावटीच्या खाद्यपदार्थांची तपासणी अन् काय घडलं!

Dope Test Before Marriage: नशा कराल तर तुमचं लग्न होणार नाही, डोप टेस्ट म्हणजे काय? लग्नाच्या आधी अनिवार्य करण्याची संसदेत मागणी

नागराज मंजुळे दिग्दर्शित मटका किंग सिरीजची रिलीज डेट जाहीर ! विजय वर्मा साकारणार मुख्य भूमिका

SCROLL FOR NEXT