Abdul Sattar esakal
महाराष्ट्र बातम्या

Abdul Sattar : सत्तार पुन्हा अडचणीत; टीईटीनंतर आता प्रतिज्ञापत्राची होणार चौकशी

60 दिवसात पोलिसांना या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल द्यावा लागणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Abdul Sattar : टीईटी परीक्षा घोटाळ्यात मुलांची नावं अल्यानंतर अडचणीत सापडलेल्या शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तांरांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. टीईटी प्रकरणाची चर्चा थांबते न थांबते तोच आता सत्तांरांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे सत्तांरांच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे. सिल्लोड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टाने मंत्री अब्दुल सत्तार यांची या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश पोलिसांना दिले असून, 60 दिवसात पोलिसांना या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल द्यावा लागणार आहे.

सत्तार यांनी निवडणुकीवेळी दिलेल्या शपथ पत्रात शेतजमीन, बिगरशेती जमीन, वाणिज्य इमारती, निवासी इमारती, शैक्षणिक अहर्तेबाबत तफावत असलेली माहिती सादर केली होती. या सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास करून महेश शंकरपेल्ली आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि इतरां विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या प्रकरणात सिल्लोड न्यायालयाने पोलिसांना सी.आर.पी.सी 202 अंतर्गत तपासाचे आदेश दिले होते.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा अहवालदेखील सादर केला होता. मात्र, फिर्यादींनी पोलिसांनी भ्रामक, त्रुटीयुक्त अहवाल देऊन अभय दिल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर आता न्यायालयाने पुन्हा पोलिसांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून 60 दिवसात अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT