Abdul Sattar and Radhakrushn Vikhe Patil 
महाराष्ट्र बातम्या

Abdul Sattar : छाती फाडून दाखवली तर विखेच दिसतील; मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर सत्तारांचं विधान

रवींद्र देशमुख

मुंबई - मागील काही दिवसांपासून राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची रस्सीखेच जोरात सुरू झाली आहे. या चर्चेत सुरुवातीला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची नाव होती. मात्र आता या रस्सीखेचमध्ये आणखी काही नाव समाविष्ट होत असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यानंतर आता राधाकृष्ण विखे पाटील यांच नावही समोर आलं आहे.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी याबाबत विधान केलं आहे. विखेंनी मुख्यमंत्री व्हावं का, असा प्रश्न विचारला असता, सत्तार म्हणाले की, मित्र मोठा व्हावा असं कोणाला वाटत नाही? विखे पाटील यांनी मुख्यमंत्री पदापेक्षाही मोठं व्हावं. मी जर हनुमानासारखा मोठा भक्त असतो, तर माझी छाती फाडून दाखवलं असतं की, माझ्या हृदयात विखे पाटीलच आहेत.

मागील काही दिवसांपासून राज्यातील मुख्यमंत्री बदलणार अशा चर्चा सुरू आहे. तसेच अजित पवार मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्या होत्या. शिवाय अजित पवार यांनी देखील मुख्यमंत्रीपदासाठी आपण आजही तयार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा नाव समोर आलं होतं.

दरम्यान सत्तार हे शिंदे गटाचे नेते असून त्यांनीच असं विधान केल्यामुळे मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चांना बळ मिळालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 3rd ODI: २-० ने मालिका जिंकली अन् आता टीम इंडियात होणार मोठा फेरबदल? तिसऱ्या वनडेत ‘या’ स्टार्सची एन्ट्री, कोण होणार OUT?

Pune News : पुण्यात २२ तासांत १२३ मुलींचे अपहरण झाल्याचा दावा खोटा; सोशल मीडियावरील ती ‘रील’ निराधार, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

Latest Marathi News Live Update : बॉलीवूड अभिनेता डिनो मोरियाची 6 तास 45 मिनिटं चौकशी

Custard Apple Season : धारूरचा हंगाम संकटात! दुष्काळाने सीताफळाचा गोडवा हिरावला; मजुरांच्या रोजगारावर होणार परिणाम

Aundha Nagnath Temple : औंढा नागनाथ मंदिर भाविकांसाठी महिनाभर बंद; नित्यपूजा मात्र सुरू राहणार

SCROLL FOR NEXT