Abdul Sattar esakal
महाराष्ट्र बातम्या

Abdul Sattar: "...नोकऱ्या मिळणार नाहीत"; कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचं अजब विधान

रुपेश नामदास

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे सतत वेगवेगळ्या विधानाने चर्चेत असतात. त्याच प्रमाणे आज देखील एक विधान केलं आहे. दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभामध्ये कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी धक्कादायक विधान केलं आहे.

कार्यक्रमात बोलताना सत्तार म्हणाले की, अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या पदव्या घेतल्या आहेत. परंतु भविष्यामध्ये सर्वांना नोकऱ्या मिळणार नाहीत, पण ज्यांना मिळणार, मी सांगितलं तर सगळ्यांना हसू आलं. मात्र आता ज्या ७५ हजार नोकऱ्या मिळणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला आणि तुमच्या पुढील लोकांना ही सुवर्ण संधी आहे. असं म्हणत सत्तारांनी वेळ मारली.

तर मागील काही दिवसांपुर्वी ते म्हणाले होते की, शेतकरी आत्महत्या हा काही आजचा विषय नाही. अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात. या विधानामुळे देखील सत्तार अडचणीत आले होते.

या आगोदर अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रीया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. सुप्रिया सुळे यांनी अब्दुल सत्तारांवर टीका करताना म्हटलं होतं की, पन्नास खोके तुम्हाला पण मिळाले आहेत का? यावर सत्तारांनी उत्तर देताना म्हटलं, ते तुम्हाला हवे आहेत का?

यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुमच्याकडे खोके आले असतील म्हणूनच तुम्ही ते आम्हाला ऑफर करता आहात. सुप्रिया सुळे यांच्या या विधानावर सत्तार भडकले आणि त्यांचं आपल्या बोलण्यावरील नियंत्रण सुटलं अन् ते म्हणाले, इतकी भिकार....झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही देऊ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: राहुल यांच्याकडून देशाची बदनामी ;अमित शहा यांची जोरदार टीका

Sakal Lit Fest: वसाहतवादी दृष्टिकोनातून इतिहास मुक्त व्हावा ;प्रसिद्ध लेखक अमिश त्रिपाठी यांचे मत; दिल्लीकेंद्री मांडणीस विरोध

IND vs NZ, Test Schedule: टी२० अन् वनडे मालिका तर जिंकली, आता रंगाणार कसोटीचा थरार; कधी अन् किती वाजता सुरू होणार सामने?

Daily Horoscope : राशिभविष्य - साेमवार १६ नोव्हेंबर २०२६

Share Market: शेअर, म्युच्युअल फंड व्यवहार थेट प्राप्तिकर विवरणपत्रात!

SCROLL FOR NEXT