Eknath Shinde, Abdul Sattar and Uddhav Thackeray  
महाराष्ट्र बातम्या

...तर मग उद्धव ठाकरेंवर कारवाई करावी लागेल; अब्दुल सत्तार यांचा थेट इशारा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - पुण्यात मंगळवारी रात्री उशीरा माजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या घरी जाताना कात्रज चौक येथे हा हल्ला झाला होता. या प्रकरणानंतर एकनाथ शिंदे गट आक्रमक झाला आहे. यावर माजी आमदार अब्दुल सत्तार यांनीही या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट कारवाईचा इशारा दिला आहे. (Abdul Sattar news in Marathi)

उदय सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे. पक्षाची, तत्वाची लढाई असेल तर ती जरुर लढावी. कदाचित आमच्या आमदारांवर असे हल्ले असतील तर नाईलाजाने त्यांच्या आमदारांवर आणि नेत्यावर हल्ले करावे लागतील. एकीकडून हल्ले होतील आणि दुसरीकडून केवळ बघ्याची भूमिका घेतली जाणार नाही, असं सत्तार यांनी म्हटलं.

या हल्ल्यामागील दोषी शोधून काढावे लागतील. दोषींवर कारवाई व्हायला हवी. या हल्ल्या मागे कोण आहे, हे पाहणं गरजेचं आहे. लोकशाहीमध्ये अशा घटनांचा जनता निषेध करत असते, असंही सत्तार यांनी नमूद केलं. उदय सामंत यांची गाडी सिग्नलवर थांबली असताना हल्ला झाला. अशा घटना चित्रपटात पाहायला मिळतात. यांच्याकडे कार्यकर्ते आहेत. आमच्याकडे नाहीत, असा सवालही सत्तार यांनी केला. लोकशाहीची लढाई लोकशाहीपद्धतीने लढावी, असा सल्लाही सत्तार यांनी दिली.

बबन थोरात यांच्या विधानावर कारवाई करण्यात येईल. उद्धवजींनी सांगितलं असेल तर त्यांच्यावरही कारवाई करावी लागेल, असा इशारा सत्तार यांनी दिली. शेवटी पक्षाचा प्रमुख चिथावणी देऊन चुकीचे काम केल्यावर सत्कार करत असेल तर त्या घटनेमागे तेच आहे, हे सिद्ध होतं, असंही सत्तार यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad News: कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू! एसटीला पसंती, बसस्थानकांवर प्रचंड गर्दी

Rohit Sharma: One Last Time! रोहितने सिडनीतून केलं ऑस्ट्रेलियाला अलविदा, सोशल मीडिया पोस्ट व्हायरल

Latest Marathi News Live Update : मालाडमध्ये ८ वर्षांच्या मुलीवर फावड्याने हल्ला

Chhattisgarh Naxalite Surrender : छत्तीसगडमध्ये या वर्षांत तब्बल दोन हजारांहून अधिक नक्षलवाद्यांनी केलं आत्मसमर्पण!

Fraud Case: एपीएमसीत विमा फसवणूक प्रकरण उघड! नावसाधर्म्याचा गैरफायदा घेऊन पॉलिसी रक्कम लाटली

SCROLL FOR NEXT