Abhijeet Bichukle  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Love Letter : तुम्ही महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हाल; अभिजीत बिचुकलेंचं पत्र चर्चेत

चर्चा आणि अभिजीत बिचुकले हे जणू समीकरणच झालं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Abhijeet Bichukale Letter To Wife : बिगबॉस फेम अभिजीत बिचुकले नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून चर्चेत असतात. चर्चा आणि अभिजीत बिचुकले हे जणू समीकरणच झालं आहे.

त्यात आता बिचुकले एखादं विधान, टिका किंवा फॅशनमुळे नव्हे तर एका पत्रामुळे चर्चेत आले आहे. आज बिचुकले यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांनी त्यांच्या पत्नीला स्वभावाप्रमाणे हटके पत्र लिहित शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या या पत्राची जोरदार चर्चा सुरू आहे.

माझी जीवनसाथी म्हणून साथ निभावत आहात. त्याबद्दल धन्यवाद, अशी कृतज्ञताही त्यांनी व्यक्त करत ''तुम्ही महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हाल'', अशा हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिजीत बिचुकले पत्रात नेमकं काय?

कवी मनाचे नेते

अभिजीत वामनराव आवाडे – बिचुकले

The Real Big Boss

25 डिसेंबर 2022

महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री सौ. अलंकृताजी

आपण माझी जीवनसाथी म्हणून जी साथ निभावत आहात त्यासाठी धन्यवाद ! आणि आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

कोणीही लग्नासाठी घातली नसेल अशी होती माझी मागणी ! आज आठवते आपल्या प्रेमाची जगावेगळी प्रेम कहाणी ।। मी सांगितले तुम्हाला, अशाच मुलीशी करेन मी लग्न जिचे विचार असतील माझ्या सामाजिक व सांस्कृतिक विचारांशी संलग्न ।।

म्हणालो होतो, मी आपणांस साताऱ्यातून उदयनराजेंच्या विरोधात उभे करणार ते ऐकूण तुम्ही दिलात होकार आणि सांगितले मी ही तुमची इच्छा पूर्ण करणार ।। 2009 साली उदयनराजेंच्या विरोधात उभी राहणारी ठरलात तुम्ही एकमेव महिला, साताऱ्यातच नव्हे तर महाराष्ट्रातही तुमच्या नावाला मिळतो मान पहिला ।।

मीच केली तुम्हाला महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री करण्याची घोषणा, आहे खात्री मला तुम्हीच न्याय दयाल नक्की सर्व सामान्य जना ।। गुरुदेव श्री. श्री. बाबा आणि आईचा आहे आपल्यावर खूप सारा आशिष, कधीच झुकणार नाही कोणा पुढेही आपल्या दोघांचे शिष ।।

प्राध्यापिका, योग शिक्षिका, सुगरण अशी आहात तुम्ही अष्टपैलू गृहिणी, संपूर्ण व्यक्तिमत्वातून दिसते तुमच्या साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ।। चि. अहम महाराज व अस्मि ताईसाहेब यांच्या संगोपनातही नाही पडत तुम्ही कमी, वारसा आपल्या घराण्याचा उज्ज्वल करणार आपण याची आहे हीच हमी ।।

स्त्रीत्वाचा अभिमान तुम्हाला आणि स्त्रियांच्या सर्व प्रश्नांची आहे तुम्हाला जाण, तुम्हीच पहिली महिला मुख्यमंत्री व्हाल तरच वाढेल खरोखर महाराष्ट्राची शान ।। शिवछत्रपती, शाहु-फुले-आंबेडकरांच्या विचारांची धरली आहे आपण कास, हीच प्रार्थना श्रींच्या चरणी की व्हावे तुमच्या हातून नेहमीच जनतेचे कार्य खास ।।

अभिजीत वामनराव आवाडे – बिचुकले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs MI Live: ना तुला, ना मला... दीपक चहर अन् रॉबिन मिंझ यांची 'पाकड्यां'सारखी फिल्डींग; हार्दिक पांड्यावर तोंड लपवण्याची वेळ Video

KKR vs MI Live: दीपक चहरने कोलकाताच्या फॅन्सना डिवचले; Finn Allen ची विकेट, सूर्याला थांब म्हणाला अन् पुढे काय केले ते पाहाच Video

Tamil Nadu Politics: तमिळनाडू सरकार अडचणीत? राष्ट्रपती राजवटीची मागणी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, प्रकरण काय?

Konkan Tourism : तारकर्लीत ‘आयएनएस गुलदार’चे पाण्याखालील संग्रहालय; नियंत्रित जलसमाधीमुळे कोकण पर्यटनाला नवी ओळख

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणानंतर पुण्यातील आरसीसी मोटेगावकर क्लासला महापालिकेची टाळेबंदी

SCROLL FOR NEXT