Abhijeet Bichukale Eknath Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

Abhijeet Bichukale : "राज्यात सिलेंडरची किंमत ५०० रुपये करा"; बिचुकलेचं थेट CM शिंदेंना पत्र

बिचुकलेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना याविषयी पत्र लिहिलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

सतत या ना त्या कारणाने चर्चेत राहणारा बिगबॉस फेम अभिजीत बिचुकले पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पत्र लिहिलं आहे. ही मागणी महिलांसाठी महत्त्वाची असल्याचंही बिचुकलेने म्हटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिहिलेल्या पत्रात बिचुकलेने सिलेंडरच्या किमती कमी करण्याची मागणी केली आहे. एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना ५० टक्के सवलत दिलीये, सिलेंडरच्या किमतीतही सवलत द्यावी, अशी मागणी बिचुकलेने केली आहे.

या पत्रात बिचुकलेने लिहिलं आहे की, महिला वर्गाला एसटी बसच्या प्रवासासाठी ५० टक्के सवलत दिली. त्याबद्दल सरकारचं अभिनंदन. याचा आनंदच आहे. पण खऱ्या अर्थाने विचार केला तर सर्वसामान्य , गरीब, उच्चवर्णीय महिलांसाठी दैनंदिन जिव्हाळ्याचा विषय म्हणजे राज्यातल्या गॅस सिलेंडरच्या दरातली प्रचंड वाढ.

नवीन मराठी वर्षानिमित्त जर नागरिकांसाठी काही चांगलं करायचं असेल तर सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी विशेष सूचना करतोय. महाराष्ट्र राज्यातल्या गॅस सिलेंडरची किंमत ५०० रुपये करावी. राज्य शासनाच्या कोट्यातून सिलेंडरच्या किमतीत ५० टक्के अनुदान किंवा सवलत जाहीर करावी म्हणजे म्हणता येईल की खऱ्या अर्थाने गरीबांची तसंच महिलांची दक्षता घेणारं हे सरकार आहे, अशी सूचना अभिजीत बिचुकलेने पत्राद्वारे राज्य सरकारला केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राला मिळणार १२ नवे IPS अधिकारी; पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश, ३१ ऑगस्टपासून सांभाळणार जबाबदारी, वाचा यादी

MD Drugs Crackdown: न्हावरेत एमडी ड्रग्सविरोधात संयुक्त धडक कारवाई; ११.९० लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे अटकेत तर एक फरार

Crime News: माळेगाव पोलिसांची अवैध दारू वाहतूक प्रकरणी कारवाई; दोन जण अटक, ४.४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

SCROLL FOR NEXT