mumbai High Court sakal
महाराष्ट्र बातम्या

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नीनं मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे सोपवण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका अभिषेक यांच्या पत्नी तेजस्वी यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे. या याचिकेची दखल घेत न्यायालयाने घोसाळकर कुटुंबियांना संबंधित सीसीटीव्ही फुटेज दाखवा असे निर्देश आज पोलिसांना दिले. (Abhishek Ghosalkar Show CCTV footage to Ghosalkar family High Court directive to police)

अभिषेक घोसाळकर यांची ८ फेब्रुवारी रोजी फेसबुक लाईव्हदरम्यान मॉरिस नोऱ्हानो याने गोळ्या झाडून हत्या केली होती. मॉरिसने ज्या पिस्तूलातून गोळ्या झाडल्या ते पिस्तुल मॉरिसचा खासगी अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याचे होते. अमरेंद्र याच्या जवळ पिस्तुल असणे आवश्यक होते मात्र या प्रकरणात त्याचा हलगर्जीपणा समोर आला त्यामुळे शस्त्रास्त्र कायदा २९ (ब) व ३० अंतर्गत त्याला पोलिसांनी अटक केली. (Latest Marathi News)

या घटनेचा सखोल तपास होणे आवश्यक असून या प्रकरणात म्हणावी तशी प्रगती झालेली नाही त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा तसेच एसआयटी नेमावी अशी मागणी तेजस्वी यांनी न्यायालयाकडे केली आहे. तेजस्वी यांनी अॅड भूषण महाडिक यांच्यामार्फत याचिका दाखल केली असून न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर आज (ता.६) या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. (Marathi Tajya Batmya)

सरकारच्यावतीने आज युक्तिवाद करताना न्यायालयाला सांगण्यात आले की, घटनेशी संबंधित सारे फुटेज गुगल टाईमनुसार ताब्यात घेण्यात आले असून कुटुंबीयांनी मागितलेली सर्व माहिती त्यांना देण्यात आली आहे. असे असताना तक्रारदार रोज काहीतरी नवी कागदपत्र सादर करत आहेत व नवीन मागणी करत आहेत. (Latest Maharashtra News)

याचिकाकर्त्यांनी हा दावा फेटाळून लावला व युक्तिवाद करताना सांगितले की, ९० दिवसांची मुदत असताना केवळ ६० दिवसांत मुंबई पोलीसांनी तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल केले तपास यंत्रणा आपले म्हणणे नीट ऐकून घेत नाही. न्यायालयाने दोन्ही बाजू कडील युक्तिवाद ऐकून घेत याचिकेवरील सुनावणी १२ जून पर्यंत तहकूब केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT