Avinash Bhosale Sakal
महाराष्ट्र बातम्या

जामीन की कोठडी? अविनाश भोसले प्रकरणी सीबीआय कोर्टात सुनावणी

पुण्यातील उद्योगपती आणि ABIL ग्रुपचे मालक अविनाश भोसले यांनी सीबीआयने अटक केली होती.

दत्ता लवांडे

मुंबई : पुण्यातील उद्योगपती आणि ABIL ग्रुपचे मालक अविनाश भोसले यांना सीबीआयने अटक केली होती. त्यानंतर त्यांनी डीएचएफएल आणि एस बॅंक घोटाळ्यात अटक केली आहे. त्यांच्या प्रकरणावर आज मुंबईतील विशेष सीबीआय कोर्टात सुनावणी होत आहे.

(Avinash Bhosale CBI Raid News Update)

भोसले यांना अटक केल्यानंतर त्यांना केलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर सीबीआयने त्यांच्या १० दिवसांची कोठडीसाठी मागणी केली आहे. याप्रकरणावर मुंबईतील विशेष सीबीआय कोर्टात आज दुपारी साडेतीन वाजता सुनावणी सुरू होणार आहे.

दरम्यान अविनाश भोसले यांना 26 मे रोजी सीबीआयने अटक केली होती. डीएचएफएल आणि येस बँक घोटाळा प्रकरणात त्यांना अटक केली आहे. त्याअगोदरही त्यांची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी करण्यात आली होती. त्यांना अटक करण्यात आल्यावर आज त्यांच्या या प्रकरणावर विशेष सीबीआय कोर्टात सुनावणी होणार आहे.

अविनाश भोसले यांची ४०.३४ कोटी रुपये किंमतीची स्थावर मालमत्ता मागच्या वर्षी जप्त करण्यात आली होती. विदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियमांतर्गत पुण्यातील शिवाजीनगर येथील गणेशखिंडमध्ये असलेल्या त्यांच्या एबीआयएल कंपनीच्या मुख्यालयावर ईडीने ही कारवाई केली होती. त्यानंतर ३० एप्रिल रोजी सीबीआयने त्यांच्याशी संबंधित संपत्तींवर छापेमारी केली होती. त्यांच्यावर विदेशी मुद्रा हस्तांतरण आणि बेकायदेशीररित्या विदेशी बँकेत खाते उघडल्याप्रकरणी ईडीने कारवाई केली होती.

अविनाश भोसले हे पतंगराव कदम यांचे व्याही आणि विश्वजित कदम यांचे सासरे आहेत. ते पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती आहेत. पुण्यातील बाणेर भागात त्यांचे अलिशान घर आहे. तसेच त्यांच्याकडे तीन हेलिकॉप्टर्स आहेत. त्यांच्या घरावर हेलिपॅडही आहेत. राजकारणी लोकांना ते हेलिकॉप्टर्स भाड्याने देतात त्यामुळे ते सारखे चर्चेत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Summer Heat : पुणे शहरात उन्हाचा तडाखा वाढला; बुधवारी ‘यलो अलर्ट’, तापमान पाऱ्याची चाळिशीकडे झेप

पगारवाढीसाठी हजारो कर्मचारी आक्रमक, रस्त्यावर उतरून आंदोलन; गाड्या पेटवल्या, पोलिसांवर दगडफेक

Malvan Ice Mystery : कोकणात निसर्गाचा अजब चमत्कार! निळ्याशार आकाशातून थेट घरावर पडला 5 किलोचा बर्फाचा गोळा; मान्सून लांबणीवर पडण्याचे संकेत?

Gold Rate Today: युद्धाच्या भीतीने सोनं स्वस्त! आजचा भाव किती? सोन्यात आणखी घसरण होणार?

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1,500 अंकांनी खाली; कारण काय? कोणत्या शेअर्सला फटका?

SCROLL FOR NEXT