abundant stock of Covishield Covaxin available in maharashtra india 
महाराष्ट्र बातम्या

राज्यात लशीचा मुबलक साठा; कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिनच्या २३ लाख डोसचे वितरण

सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकचे कोव्हॅक्सिन अशा दोन्ही लशींचे २३ लाख ३६ हजार डोस आहेत. वेगवेगळे जिल्हा आणि महापालिकांमध्ये याचे वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात लशीचा कोणताही तुटवडा नाही, असे सार्वजनिक आरोग्य खात्याच्या संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी स्पष्ट केले.डॉ. पाटील म्हणाल्या, “कोव्हिशिल्ड लशीचा १५ लाख ३६ हजार डोसचा साठा राज्यातील जिल्ह्यांमध्ये आहे. त्याशिवाय ३ लाख डोससाठा राज्याने राखीव ठेवला आहे. तसेच, कोव्हॅक्शिनच्या आठ लाख लशींचे डोस मिळाले आहेत. त्याचे वितरण सुरू आहे. त्यामुळे राज्यात लशीचा तुटवडा नाही. राज्याला मिळालेली लस प्रत्येक लसीकरण केंद्रापर्यंत वितरित झाली आहे. त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येकाला पहिला आणि दुसरा डोस देता येईल इतका लशीचा साठा आहे.”

राज्यात पुणे, अमरावती, मुंबई, सोलापूर, नागपूर आणि औरंगाबाद या सहा शहरांमध्ये कोव्हॅक्सिन लस दिली जात होती. त्यावेळी ही लस घेणाऱ्यांकडून संमतिपत्र घेतले जात होते. आता या संमतीपत्राची गरज नसल्याचेही डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.

हे आहे लस पुरवठ्याचे गणित
गेल्या काही दिवसांमधील जिल्ह्याने जास्तीत जास्त किती जणांना लस दिली, त्याला दहाने गुणायचे. त्याप्रमाणे जिल्ह्यांना लशीचा पुरवठा करण्याचे सूत्र आरोग्य खात्याने स्वीकारले आहे. त्यामुळे जिल्ह्यांना किमान दहा दिवसांचा लशींचा साठा मिळेल.

दृष्टीक्षेपात शहरातील लसीकरण

  • पुण्यातील ८५ केंद्रांमधून १४ हजार ५७४ जणांनी सोमवारी लस घेतली
  • लसीकरणात सात हजार ९९४ ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग
  • सहव्याधी असलेल्या एक हजार ७५२ रुग्णांनी घेतली लस
  • कोव्हॅक्सिन घेतलेल्यांची संख्या ४३६
  • कोव्हिशिल्ड घेतलेल्यांची संख्या २६ हजार ६४
  • पुणे जिल्ह्यातील एकूण लसीकरण २५ हजार ५६०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : मुंबईत होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या कार्यक्रमासाठी मनसेचे पदाधिकारी रवाना

SCROLL FOR NEXT