Rajan Salvi
Rajan Salvi 
महाराष्ट्र

Rajan Salvi : ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहीलेल्या राजन साळवींच्या अडचणीत वाढ! आता...

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे राजापूरचे आमदार आणि उपनेते राजन साळवी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राजन साळवी यांच्या पिएला एसीबीची नोटीस आली आहे. राजन साळवी यांच्या चौकशीच्या अनुषंगाने पीएचा देखील जवाब नोंदवण्यात येईल. यापूर्वी राजन साळवींनी दोन वेळा एसीबी कार्यालयात हजेरी लावली होती. आता त्यांच्या पीएला नोटीस आली आहे. 

राजन साळवी यांच्या मालमत्ता वाढीसंदर्भात सध्या चौकशी सुरू आहे. त्यामुळे पीएचा जवाब नोंदवण्यासाठी एसीबीने नोटीस बजावली आहे. आज अकरा वाजता पीए सुभाष मालक यांना एसीबीने बोलावले होते. मात्र त्यांना नोटीस उशीरा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. 

यापूर्वी राजन साळवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक (ईडी) विभागाने मालमत्ते संदर्भात नोटीस पाठवली आहे. रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मालमत्तेच्या चौकशीसंदर्भात नोटीस बजावण्यात आली होती.

कोकणातून शिवसेनेच्या नऊ आमदारांपैकी केवळ ३ आमदार उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले. बाकी सर्व आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. एकनिष्ठ राहिलेल्या आमदारांमध्ये आमदार साळवी यांचा समावेश आहे.

यापूर्वी कोकणातील आमदार वैभव नाईक यांना नोटीस बजावण्यात आलेली होती. त्यानंतर आता साळवी यांना नोटीस बजावण्यात आली असून, ते आता चौकशीच्या फेऱ्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: भारतीय सैन्याकडे पाहून साताऱ्यातील लष्करी कुटुंबे आनंदी : PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT