Accident truck Samriddhi highway fell under bridge
Accident truck Samriddhi highway fell under bridge  sakal
महाराष्ट्र

Accident News : समृद्धी महामार्गावर धावता मालवाहू ट्रक पुलाखाली कोसळला

सकाळ वृत्तसेवा

दौलताबाद : फतीयाबद (ता.गंगापूर) येथून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरून धावता मालवाहू ट्रक पुलाच्यामधून खाली कोसळून झालेल्या अपघातात  चालक व क्लिनर सजाळून कोळसा झाल्याची शकता वर्तवण्यात येत आहे. ही घटना शुक्रवारी (ता.3)रात्री 11 च्या सुमारास घडली.

हे बाबत अधिक माहिती अशी की, शिर्डी येथून नागपूरच्या दिशेने केमिकल बॅरल घेऊन जाणारा मालवाहू ट्रक वेरूळ इंटरचेंजच्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या गोकुल वाडी येथील समृद्धीच्या पूल जवळ कठडे नसल्याने रात्रीच्या वेळी चालकाला दिसले नाही व त्यामुळे ट्रक पुलाच्या मधोमध असलेल्या पोकळी मधून पडून यात चालक व क्लिनर जाळून खाक झाले असल्याची शक्यता आहे.

या घताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन यासमृद्धी महामार्गाच्या पाच ते सहा अग्नीशामक वाहनानी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला . परंतु आग आटोक्यात आली नाही. यानंतर औरंगाबाद येथून महापालिकेच्या अग्निशामक वाहनांना पाचारण करण्यात आले.

यानंतर ही आग आटोक्यात आली. दरम्यान या अपघातात मालवाहू ट्रक मध्ये चालक क्लीनरसह किती जण होते याची अद्याप माहिती मिळाली नाही. अपघाताची माहिती मिळताच दौलताबाद पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी यांनी अपघात स्थळी धाव घेतली.

दरम्यान, तीन दिवसात पुलावरून वाहन पडण्याची ही दुसरी घटना असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. एक खाजगी कार पुलावरून पडली. परंतु त्या कारची एअर बॅग उघडल्याने जीवित हानी झाली नाही. त्यामुळे अपघाताची पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती.

अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी झाली होती. दौलताबाद पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक  सुरळीत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT