Sharad Pawar Deepali Sayyad esakal
महाराष्ट्र बातम्या

'महाराष्ट्र केसरी'ची नवी ओळख महिला कुस्तीगिरांना मिळावी : दिपाली सय्यद

सकाळ डिजिटल टीम

आता शरद पवार दिपाली सय्यद यांच्या मागणीवर काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सातारा : महाराष्ट्र केसरी कुस्ती (Maharashtra Kesari Kusti) स्पर्धा (Competition) साताऱ्यातील (Satara) श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात आजपासून (मंगळवार) रंगणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या अभिनेत्री दिपाली सय्यद (Deepali Sayyad) यांनी आज शरद पवार (Sharad Pawar) यांची नवी दिल्लीत भेट घेतली. दरम्यान, दिपाली सय्यद यांनी शरद पवारांकडं महाराष्ट्रात महिला कुस्ती स्पर्धा भरवण्याची मागणी केलीय.

आता शरद पवार दिपाली सय्यद यांच्या मागणीवर काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दिपाली सय्यद यांनी मार्च महिन्यात सोलापूरमध्ये देखील यासंदर्भात भूमिका मांडली होती. दरम्यान, आता दिपाली सय्यद यांनी शरद पवारांना एक पत्र लिहिलीय, या पत्रात त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलीय. दिपाली सय्यद यांनी शरद पवारांना लिहिलेल्या पत्रात म्हंटलंय, आदरणीय साहेब.. सर्व प्रथम महाराष्ट्र केसरी सुरू करून आपण कुस्तीगीरांना न्याय मिळवून दिलात या करिता आपली खूप आभारी आहे. दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही आपल्या कार्यात महिला कुस्तीगिरांच्या प्रगतीसाठी, तसंच महिला कुस्तीगिरांच्या शासकीय सेवा अशा अनेक विषयांत हातभार लावू इच्छितो. आपल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेमार्फत विविध राज्यस्तरीय महिला कुस्ती स्पर्धा घेतल्या जातात, परंतु पुरूष महाराष्ट्र केसरीप्रमाणे स्वतंत्र महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत नाही याची खंत आहे.

महाराष्ट्राला पुरुष महाराष्ट्र केसरी विचारले, तर जगजाहीर आहे तसंच जर महिला महाराष्ट्र केसरी कोण? तरी अद्याप माहिती नाही. आदरणीय साहेब आपणांस विनंती आहे की, पुरुष महाराष्ट्र केसरीप्रमाणं स्वतंत्रपणे महिला महाराष्ट्र केसरीची नवीन ओळख महिला कुस्तीगीरांना मिळावी, हाच एकमेव उद्देश साध्य व्हावा याचसाठी हे प्रयोजन, असं त्यांनी पत्रात नमूद केलंय. महाराष्ट्रात महिलांसाठी स्वतंत्र महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत नाही, ही खंत असल्याचंही मत दिपाली सय्यद यांनी व्यक्त केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

IND vs WI, 3rd T20I: भारतीय संघात दोन मोठे बदल; वैभव सूर्यवंशीला मिळली संधी? जाणून घ्या Playing XI

Delhi Police Detention Row : "या पोलिसांच्या बसेस आहेत की छळ छावण्या?"; आंदोलक नेहा बोराचा बसमधून व्हिडिओ शेअर करत थेट सवाल!

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Electric Shock: जमिनीपासून अवघ्या ४ फुटांवर वीजवाहिनी; विजेचा धक्का लागून दोन म्हशींचा मृत्यू; प्रसंगावधान राखल्याने तीन म्हशी वाचल्या

SCROLL FOR NEXT