Meme
Meme Tweeter
महाराष्ट्र

नेमकं काय चाललंय?; मीम शेअर करत पूनावालांचा खोचक टोला

निनाद कुलकर्णी

पुणे : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने (Coroana New Variant) अवघ्या जगाची चिंता वाढवली आहे. तर दुसरीकडे कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण (Covid Vaccination ) करण्यावर भर दिला जात आहे. अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनच्या (Omicron) धास्तीने लसीचा बूस्टर (Vaccine Booster Dose) डोसदेखील दिला जात आहे. मात्र, भारतात अद्यापपर्यंत संपूर्ण लोकसंख्येचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेले नसून पूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांना बूस्टर (Booster Dose In India) डोस देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सध्या हा मुद्दा चर्चेत असून अद्याप यावर कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही. या सर्व चर्चांमध्ये सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला (serum institute of India) यांनी नेमकं काय चाललंय कुणी सांगेल का मला, असा प्रश्न उपस्थित करत सध्याच्या परिस्थितीवर खोचक टोला लगावला आहे. (SII Adar Poonawala Share funny video on booster dose)

पुनावाला यांनी शेअर केलेला व्हिडिओ म्हणजे कोरोनाचा यापूर्वी आलेला डेल्टा आणि सध्या नव्याने आलेला कोरोनाचा नवा व्हेरिएंट यांच्यावरील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेले मीम आहे. या मीम होम अलोन या टीव्ही शोमधल्या एक सीन दाखविण्यात आला असून, त्यात डेल्टा, ओमिक्रॉन आणि व्हॅक्सिनचा समावेश करून भन्नाट मीम तयार करण्यात आले आहे.

व्हिडीओमध्ये आधी ओमायक्रॉन नाव दिलेला हॅरी घरात शिरण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी होम अलोनमधील लहान मुलाचे पात्र असलेला केविन मॅककॅलिस्टर वरच्या मजल्यावरून दोरीला बांधलेली कुंडी खाली सोडतो. त्यावर व्हॅक्सिन असे लिहिलेले आहे. यावेळी ओमिक्रॉन खाली वाकतो आणि व्हॅक्सिनमुळे डेल्टाचा खात्मा होतो असे दाखविण्यात आले आहे. डेल्टाचा खात्मा झाल्याचे पाहून ओमिक्रॉनला आनंद होतो, मात्र त्याचवेळी मॅककॅलिस्टर पुन्हा आणखी एक कुंडी फेकतो ज्यावर बूस्टर डोस असे लिहिलेले आहे. ही कुंडी ओमिक्रॉनवर आदळते आणि तोही खाली कोसळतो असे दाखविण्यात आले आहे.

व्हिडिओचा मूळ उद्देश काय?

पूनावाला (Adar Poonawala) यांनी शेअर केलेले हे मीम (Meme) मूळत: जॉन हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थने करोना आणि लसीकरणाविषयी जनजागृती करण्यासाठी शेअर केले आहे. दरम्यान, याचाच आधार घेत सध्या आपल्यादेशात बूस्टर डोसबाबत होत असलेल्या चर्चांशी संबंधित चर्चांच्या अनुशंगाने सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी इथे नेमकं काय चाललंय कुणी सांगेल का मला, असा प्रश्न उपस्थित करत सुरू असलेल्या परिस्थितीवर खोचक टोला लगावला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याणमधून ठाकरे उमेदवार बदलणार? आणखी एक अर्ज दाखल झाल्यानं चर्चेला उधाण

Latest Marathi News Live Update : दक्षिण मुंबईतून शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

Aranmanai 4 Twitter Review: कुणी म्हणालं, 'ब्लॉकबस्टर' तर कुणी म्हणालं, 'जबरदस्त VFX'; तमन्नाच्या 'अरनमनई 4'नं जिंकली नेटकऱ्यांची मनं

Naach Ga Ghuma Review: 'ती' देखील वर्किंग वूमनच...? हास्य आणि भावनिक क्षणांची रोलर कोस्टर राईड

IND vs PAK T20 World Cup 24 : सामना भारत - पाकिस्तानचा फायदा न्यूयॉर्कच्या हॉटेल्सचा! तब्बल 600 टक्क्यांनी वाढलं रूम्सचं भाडं

SCROLL FOR NEXT