Jalna Maratha andolan 
महाराष्ट्र बातम्या

Maratha Andolan : अतिरिक्त पोलीस महासंचालक सक्सेना जरांगे यांच्या भेटीला; दिलं महत्त्वपूर्ण आश्वासन

रवींद्र देशमुख

Maratha Reservation : अंतरवाली सराटी येथे लाठीचार्ज व दगडफेकीची घटना घडली होती. या घटनेचा याचा चौकशी अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला जाईल, असे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांनी बुधवारी (ता. सहा) अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.


जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू कऱण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू असून जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडत चालली आहे.

या पार्श्वभूमीवर राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय संक्सेना यांनी जरांगे पाटील यांची आंदोलनस्थळी जावून भेट घेतली. काही दिवसांपूर्वीच आंदोलकांवर मोठ्या प्रमाणात पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता.

राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. तसेच लाठीचार्जसाठी दोषी असलेल्या पोलिसांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी पोलीस अधीक्षकही उपोषणस्थळी दाखल होते.

दरम्यान सक्सेना यांनी डॉक्टरांकडून जरांगे यांच्या तब्येतीची माहिती घेतली. तसेच दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत काही मुद्दे उपस्थित केले. ते मुद्दे चौकशी दरम्यान तपासले जातील, असं सांगताना मनोज जरांगे यांच्यासह गावकऱ्यांशी चर्चा केली संजय सक्सेना यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत कोट्यवधींचं घर विकलं अन् घेतली बाईक! कारण काय? स्टार्टअप फाउंडरने सांगितली धक्कादायक निर्णयामागची कहाणी

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करा, संयुक्त जमीन मोजणीला गती द्या; शक्तिपीठ महामार्गाबाबत आवाहन

Marathi News Live Updates : पुण्यातील नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

Encroachment : नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

SCROLL FOR NEXT