Narayan Rane and Aditya Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

तुम्ही फक्त मंत्रीपदाचा 'फुलफॉर्म' सांगून दाखवा; आदित्य ठाकरेंचं राणेंना थेट आव्हान

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - केंद्रीयमंत्री आणि भाजपनेते नारायण राणे सातत्याने ठाकरे कुटुंबावर हल्लाबोल करत आहेत. अनेकदा ते आदित्य ठाकरे यांच्यावर अत्यंत हिन भाषेत टीका करताना दिसतात. मात्र आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नारायण राणेंना थेट प्रत्युत्तर दिलं आहे.

नारायण राणे म्हणाले की, शिवसेनेचा गट कुठं राहिला? शिवसेना ५६ वरून ५-६ वर आली आहे. त्यातील काहीजण माझ्या संपर्कात असल्याचं राणे यांनी म्हटलं होतं.

राणे यांच्या या टीकेवर आदित्य ठाकरे म्हणाले की, त्यांना मागील १६ वर्षांची सवयच आहे. त्यांनी मंत्री म्हणून केलेलं एक तरी चांगलं काम दाखवाव. चार पक्षात जावून त्यांनी एकही काम केलं नाही. जाऊद्या राणे यांनी त्यांच्याकडे असलेल्या मंत्रीपदाचा किमान फुलफॉर्म सांगावा, असं थेट आव्हान आदित्य यांनी दिल आहे.

दसरा मेळाव्यानंतर नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला होता. नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे आणि निलेश राणे दोघेही सातत्याने उध्दव ठाकरे कुटुंबावर हल्ला करत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''ज्या देशाने परकियांचा माज उतरवला, तिथे स्वकियांचा माज जनता उतरवणार नाही वाटतं का?'' राज ठाकरे संतापले...

पांडुरंगाची सेवा की कीर्तनाचा बाजार? कसा आहे 'पाच फुटाचा बच्चन' सिनेमा?

''जमेल तसे जंतरमंतरवर या, पोलिसांनी अडवल तर...''; आंदोलनाची सूत्रे हाती घेताच अजिंक्य शिंदेची प्रतिक्रिया

Marathi News Live Updates : अभिजीत दीपकेंना आजीच्या अंत्यसंस्कारासाठी जाण्याची परवानगी

Nana Patekar Death: गौरीमुळे मला अटक झाली, नानांनी सोडवून आणलं; शाहरुख खानने सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा

SCROLL FOR NEXT