Aditya Thackeray on Raj Thackeray Aurangabad Meeting sakal
महाराष्ट्र बातम्या

'आम्ही औरंगाबादेत...', आदित्य ठाकरेंचा राज यांना टोला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : येत्या ५ जूनला राज ठाकरे अयोध्याच्या दौऱ्यावर (Raj Thackeray Ayodhya Visit) जाणार आहेत. त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्यानंतर आदित्य ठाकरे देखील अयोध्येचा दौरा (Aditya Thackeray Ayodhya Visit) करणार आहेत. पण, आमचा राजकीय दौरा नाही, तर श्रद्धेपोटी अयोध्येला जाणार आहे, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. तसेच त्यांनी औरंगाबादच्या सभेवरून राज ठाकरेंना टोला लगावला आहे. आज मुंबईत व्ह्युविंग डेकचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

आम्ही निवडणुकीत प्रचार करतो. पण, त्यानंतर काम करतो आणि याच कामांचं उद्घाटन आता सुरू आहे. आम्ही निवडणुकीसाठी काम करत नाही. आम्ही विकासासाठी काम करतो, असं आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच त्यांनी अयोध्या दौऱ्याबाबत देखील माहिती दिली. न्यायालयाने अयोध्येतील संघर्ष संपवला आहे. अयोध्येत संघर्ष सुरू असताना पहिले मंदीर फिर सरकार, असं आम्ही म्हटलं होतं. आम्ही त्यावेळी देखील अयोध्येत गेलो होतो. आता तिथला संघर्ष संपलेला आहे. आता आम्ही श्रद्धेपोटी अयोध्येचा दौरा करणार आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच मनसेच्या हनुमान चालिसा पठणाबद्दल देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. मी देखील हनुमान चालिसा पठण केलं. पण, आम्ही त्याचं राजकारण करत नाही, असं ठाकरे म्हणाले.

औरंगाबाद सभेवरून टोला -

औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. याठिकाणी राज ठाकरे येत्या १ मे रोजी सभा घेणार आहेत. त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत घोषणा केली. त्यावरून देखील आदित्य ठाकरेंनी टोला लगावला आहे. राज ठाकरे औरंगाबादेत सभा घेतात, पण आम्ही तिथे पर्यटन वाढवत आहोत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

दरम्यान, देशभरात हनुमान जयंतीनिमित्त हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. तसेच राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी ३ मेचा अल्टीमेटम दिला आहे. त्याबाबत प्रश्न विचारला असता, आदित्य ठाकरे म्हणाले महाराष्ट्रात कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेची समस्या उद्भवणार नाही. आमचे सरकार सर्व हाताळण्यात समर्थ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: चक दे इंडिया! भारताचा पाकिस्तानवर रोमहर्षक विजय; हॉकीचं सुवर्णपदक आता एक विजय दूर...

Hingoli Court : चोर कोर्टात तारखेसाठी आले अन् इन्व्हर्टर, बॅटरीच पळवली; हिंगोलीत चोरट्यांचा प्रताप, काय आहे प्रकरण?

Ration Card: 'त्या' शिधापत्रिका निष्क्रिय होणार, सहा महिने धान्याची उचल नसल्यास सरकार घेणार मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : 'काळजी करु नका, न्याय मिळवून देऊ'; उद्धव ठाकरेंकडून प्रदीप पुर्णेकर यांच्या कुटुंबीयांना ग्वाही

Shrigonda News: विवाहितेसह २२ वर्षीय तरुणाने एकत्रच संपवलं आयुष्य; नगरमधील घटनेनं खळबळ; पोलीस तपास सुरू

SCROLL FOR NEXT