Aditya Thackeray e sakal
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्रात रामराज्य आणण्यासाठी मी आयोध्येला जातोय : आदित्य ठाकरे

राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहून इशारा दिला आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहून इशारा दिला आहे. त्यानंतर शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

(Aditya Thackeray On Raj Thackeray Letter To CM Thackeray)

राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून आमचा अंत पाहू नका असा इशारा दिला आहे. त्यावर बोलायला आदित्य ठाकरे यांनी नकार दिला आहे. आम्ही राजकारणासाठी आयोध्येला जात नसून दर्शनासाठी जात असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच आयोध्येचा संघर्ष जेव्हा सुरू होता तेव्हा शिवसेना तिथे गेली होती असं ते म्हणाले.

शिवसेनेने संघर्षामध्ये सहभाग घेतला होता आणि कोर्टाने निकाल दिल्यावर मंदिराचं बांधकाम सुरू झालं होतं. आता सगळा संघर्ष संपलेला आहे, आता आम्ही दर्शनासाठी जात आहोत, कुठंल्याही राजकारणासाठी जात नाही, आमचे ते शक्तीस्थान आहे, आम्ही तिथे जाऊन आशिर्वाद घेणार आहोत असं ते माध्यमांना बोलताना म्हणाले.

दरम्यान सध्या राज्यात महाविकास आघाडी हे विकासाचं राजकारण करत आहे. आम्ही सामाजिक, शैक्षणिक, आणि आरोग्याचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले जात आहेत पण सध्या राज्यात काही लोकं तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे.

सध्या राज्यात बेरोजगारी आणि महागाई यावर कुणी बोलत नाही पण आयोध्येत २५ वर्षापूर्वी काय झालं यावर लोकं चर्चा करतात, पण आम्ही कुठल्या राजकीय हेतूसाठी नाहीतर दर्शनासाठी जाणार आहोत असं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shardul Thakur : चूक सांगण्यासाठी धावत आलेल्या शार्दूलचं रोहित शर्माने ऐकूनच घेतले नाही अन् मग...; Video

कसं झालं 'लस्ट- स्टोरीज ३' मधील सिद्धार्थ-अदिती राव हैदरीच्या इंटिमेट सीनचं शूटिंग? म्हणाला, 'दोघांमध्ये उशी...'

Marathi News Live Updates : महायुती सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेईल - खासदार सुनील तटकरे

Satara News: हरवलेली लेक अन् काळजीत आई; शिंगणापूर पोलिसांच्या तत्परतेने पुन्हा घडली मायलेकींची भेट, काळोखात नेमकं काय घडलं?

Malkapur Auto Garage Battery Theft, One Thief Caught: गॅरेज फोडून बॅटऱ्या चोरणाऱ्याला रंगेहात अटक

SCROLL FOR NEXT