aditya Thackeray reaction on sanjay raut bail shivsena Maharashtra politics  e sakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut Bail: संजय राऊतांच्या निष्ठेबद्दल आदित्य ठाकरे यांचे मोठे विधान, म्हणाले…

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: खासदार संजय राऊत यांना तब्बल १०० दिवसांनंतर जामीन मिळाला आहे, अखेर पीएमएल कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या समर्थकांकडून जल्लोष करत या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. यादरम्यान आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. ते निष्ठावंत शिवसैनिक आहेतच, पण ते बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहेत, नुसता मुखवटा लावून फिरत नाहीत. त्यांच्यावर देखील दबावतंत्र वापरलं तरू ते पळून गेले नाहीत, त्यांनी गद्दारी केली नाही. ते डरपोक नाहीत हे जनतेसमोर आलं आहे, असे अदित्य ठाकरे म्हणाले.

पुढे बोलतान ठाकरे म्हणाले की, जे कोणी सत्तेच्या विरोधात बोललं की दबावतंत्र वापरलं जातं, आज राजकीय लोकांवर कारवाई होते आहे ज्यांना एटएमव्ही म्हणातात त्यांच्यावर कारवाई होते. उद्या जनतेवर कारवाई होऊ शकते ही धोक्याची घंटा आहे.

हेही वाचा : बातम्या, टिप्सचा गुंतवणुकीवर नका होऊ देऊ परिणाम

पन्नास खोके एकदम ओके म्हणणाऱ्यांना नोटीसा पाठवल्या जात आहेत याबद्दल विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले की, त्यांना अशा खूप नोटीसा द्याव्या लागतील. बैल पोळ्याला दिवशी दोन बैलांवर जे होतं त्यालाही नोटीस द्यावी लागेल, आम्हाला तर खुशाल द्या. मग महाराष्ट्राच्या १३ कोटी जनाता आहे त्यांना, ३३ देशांनी गद्दारीची दखल घेतली त्यांनाही नोटीस द्या, अशा खोचक शब्दात प्रतिक्रिया दिली.

पत्राचाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊत यांनी ३१ जुलै रोजी ईडीने अटक केली होती. त्यानंतर राऊत यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे संजय राऊत यांचा दिवाळी आणि दसरा देखील आर्थर रोड तुरूंगाात केला होता. दरम्यान आता तब्बल १०० दिवसांनंतर संजय राऊत यांनी जामीन मिळाला आहे. तसेच ईडी जामीनाला स्थगीती मिळावी यासाठी प्रयत्न करत असून हायकोर्टात जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Close : आज शेअर बाजार हिरव्या रंगात बंद! सेन्सेक्स ९३९ अंकांनी वधारला तर निफ्टी २५८ अंकांनी वर, कोणते शेअर्स फायद्यात? पाहा

अरे तो वाघ आहे...! विदर्भात लोकांचा मुर्खपणा, मोबाईल कॅमेरा घेऊन जंगलच्या राजाचा पाठलाग, VIDEO VIRAL

Mpsc Success Story: बेस्ट वाहकाचा मुलगा बनला पाेलिस उपनिरीक्षक, सूरज गोळेची प्रतिकूल परिस्थितीवर करत यशाला गवसणी; आई राबतेय शेतात!

Latest Marathi Update : कांदिवलीमध्ये घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी मोठी गर्दी

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात मुक्त शिक्षण व्यवस्था राबवणार, शिक्षण विभागाचा नवा प्लॅन, नेमकी योजना काय?

SCROLL FOR NEXT