Aditya Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Aditya Thackeray : आम्ही भोळे आहोत, उद्धव साहेबांना अन् मला राजकारण कळत नाही; नाशिकमध्ये आदित्य ठाकरे भावनिक

सकाळ डिजिटल टीम

नाशिकः ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे हे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर घणाघात केला. ते म्हणाले की, सध्याला देशाची आणि महाराष्ट्राची राजकीय स्थिती अवघड झाली आहे. आपण लढत आहोत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात पुढे जात होता, आज कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? असा प्रश्न जनतेला पडला आहे. 

पुढे बोलतांना आदित्य म्हणाले की, वेदांता फॉक्सकॉन गेल्याने राज्याचं मोठं नुकसान झालं आहे. रोजगार गेला आहे. अनेक प्रकल्प महाराष्ट्रमधून गेले. दारं-खिडक्या उघड्या ठेवल्या असून तिथून सर्व उद्योग राज्याबाहेर जात आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते तर गुजरातला उद्योग गेले नसते, ते महाराष्ट्रामध्येच राहिले असते, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.

''एकीकडे राज्यात फोडाफोडीचं राजकरण सुरु असून कोण आमदार, खासदार कुठून येतो काही कळत नाही. राज्यातील खोके सरकार हे घोषणांचे सरकार आहे. घोषणा केल्या की घटनाबाह्य मुख्यमंत्री आले असे वाटतं. राजकारणाची दलदल झाली आहे. कोण कोणाचे फोटो लावतो ते समजत नाही. आम्ही भोळे आहोत, उद्धव साहेब आणि आम्हाला राजकारण कळत नाही. हा आमचा गुण आहे की अवगुण? हेच कळत नाही. फोफाफोडीच राजकरण आम्हांला समजत नाही.'' असेही ते म्हणाले. 

या देशाच्या आवाज बुलंद करायचा असेल तर आपल्याला एकत्र यावं लागेल. आपल्याला प्रत्येक कोनाकोपऱ्यात फिरावं लागेल. देशात हुकूमशाहीचा राजकारण सुरु आहे. बोललं तरी गुन्हे दाखल होत आहेत. असं शेवटी आदित्य ठाकरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule: विद्यार्थ्यांच्या नव्हे, राहुल यांच्या आंदोलनाला ‘नौटंकी’ म्हटले; चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण

Maharashtra Weather : कमी दाबाचा पट्टा सक्रिय पण महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होणार; पुढच्या चार दिवसांचा हवामान अंदाज असा

Live Updates Marathi :हिंजवडी शिवाजीनगर मेट्रोच्या माण ते बालेवाडी टप्प्याला सुरक्षा मंजुरी

Ashadhi Ekadashi 2026 Marathi Wishes: "अवघा रंग एक झाला..." आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना पाठवा विठ्ठलभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

Amruta Fadnavis Fugdi Video : 'पंढरपुरात विठूरायाची भक्ती अन्...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीसांनी घातली फुगडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT