Aditya Thackeray statement on cm Eknath Shinde Vedanta-Foxconn ratnagiri politics  sakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde-Aditya Thackeray : "मुख्यमंत्र्यांना जनतेशी देणे-घेणे नाही"

आदित्य ठाकरे : आम्ही पुढे नेलेला महाराष्ट्र सरकारने पुन्हा मागे खेचला

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : राज्यातून ‘वेदांत-फॉक्सकॉन’सह आणखी काही प्रकल्प गेले. कर्नाटक, गुजरात, तेलंगणमध्ये हे घडले असते, तर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता; परंतु तात्पुरत्या आणि डबल इंजिनच्या या सरकारला त्याचे गांभीर्य नाही. आम्ही पुढे नेलेला महाराष्ट्र त्यांनी मागे खेचला. मुख्यमंत्री आधी दहीहंडीत व्यग्र होते, नंतर गणेशोत्सवामध्ये फिरले, आता नवरात्रोत्सवात व्यग्र असतील. त्यांना जनतेशी काही देणे-घेणे नाही. आतातरी त्यांनी राज्यातील प्रकल्प, शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी याकडे लक्ष द्यावे, असा हल्लाबोल शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसह भाजप आणि शिंदे सरकारवर केला.

राज्याच्या उद्योगमंत्र्यांना प्रकल्प गेल्याची कल्पना नसणे यासारखी दुर्दैवी बाब नाही, असा चिमटाही त्यांनी काढला. संवादनिष्ठा यात्रेनिमित्त रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथील सभेत त्यांनी शिंदे गटाचा खरपूस समाचार घेतला. या यात्रेच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

ठाकरे म्हणाले, ‘‘हा उत्साह पाहून मी खात्री देऊ शकतो की, ज्या ठिकाणी गद्दारी झाली, तेथे पुन्हा एकदा शिवसैनिक जिंकून येणारच. महिलांनी उद्धव ठाकरेंमध्ये विश्वासू माणूस आणि कुटुंबातील मुख्यमंत्री पाहिला, म्हणून महिलावर्ग त्यांच्यामागे ठाम उभा आहे. जिथे स्थानिक आमदारांनी गद्दारी केली तेथे मला जनतेचा कौल पाहिजे. स्वतःला खोके आणि महाराष्ट्राला धोके, अशी या गद्दारांची स्थिती आहे. हिंमत असेल तर निवडणुकीला सामोरे जा. होऊन जाऊ दे, मग जनता तुम्हाला जागा दाखवून देईल. ४० आमदारांऐवजी ४१ आमदारांची निवडणूक घ्या. मी पण राजीनामा देतो,’’ असे आव्हान त्यांनी दिले. या वेळी खासदार विनायक राऊत, अनंत गीते, आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, जिल्हाप्रमुख विलास चाळके आदी उपस्थित होते.

उद्योगांबाबत मंत्री अनभिज्ञ

आदित्य ठाकरे म्हणाले, ‘राज्यातील उद्योगांची मंत्र्यांनाच माहिती नाही याची लाज वाटते. वेदांत-फॉक्सकॉन, बल्टपार्क यापैकी एकही प्रस्ताव आताच्या उद्योगमंत्र्यांना माहिती नाही. मुख्यमंत्री कोण हेच माहिती नाही. डबल इंजिन सरकार आहे. यांनी आमच्याशीच नाही, तर महाराष्ट्राशी गद्दारी केली.’ तुम्ही कोणाबरोबर शिवसेना की खोके सरकारबरोबर, असे त्यांनी विचारताच कार्यकर्त्यांनी शिवसेनेबरोबर, असा हात वर करून शिवसेनेच्या पाठीशी उभे राहण्याचा विश्वास दिला.

कोणाचे सरकार हे महत्त्वाचे नाही; पण आपण तरुणांना किती रोजगार दिले हे महत्त्वाचे आहे. केंद्राने काही प्रकल्प दिले; परंतु ते राज्य सरकारला महाराष्ट्रात थांबवता आले नाहीत. त्यामुळे केंद्रावर टीका करणार नाही. आम्ही साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक आणली. मग तुम्ही गुंतवणूक आणू शकत नाही का?

-आदित्य ठाकरे, नेते, शिवसेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाडांवर अद्याप कारवाई नाहीच; वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची माहिती

Donald Trump : ट्रम्प यांना मोठा झटका! जन्मसिद्ध नागरिकत्वाच्या आदेशाला न्यायाधीशांची स्थगिती

Wimbledon Women Final: अव्वल मानांकित सबलेंकाला धक्का; अमेरिकेची अमांडा ॲनिसिमोवा अंतिम फेरीत

Satara Crime: 'दोन महिलांना मारहाण करून लुटले'; मॉर्निंग वॉकसाठी जाताना प्रकार, साडेसात तोळे दागिने लंपास

Breakfast Recipe: वीकेंडच्या नाश्त्यासाठी घरी बनवा चविष्ट चीझ गार्लिक ब्रेड, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT