Eknath Shinde Esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde: आदित्य ठाकरेंच्या 'त्या' विधानावर CM शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले...

एकनाथ शिंदे मातोश्रीवर रडले! भाजपमध्ये गेलो नाहीतर जेलमध्ये टाकतील असं आदित्य ठाकरे म्हणाले होते

अंकिता खाणे (Ankita Khane)

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी काल एक गौप्यस्फोट केला. राज्याच्या सत्तांतराचा वाद सुप्रीम कोर्टात आहे. न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. मात्र निकालापूर्वी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत ते बोलले होते.

एकनाथ शिंदे यांनी जेलमध्ये जाण्याच्या भीतीने बंड पुकारत भाजपसोबत सत्ता स्थापन केली, असं आदित्य ठाकरे यांनी म्हंटलं होतं. भाजपमध्ये गेलो नाही तर मला जेलमध्ये टाकतील. तसेच एकनाथ शिंदे त्यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थानी येऊन अक्षरश: रडले होते, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.

आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आदित्य ठाकरेंकडे कुठे लक्ष देता, ते जाऊ द्या रे. ते लहान आहेत. दोन शब्दात त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

त्याचबरोबर भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही आदित्य ठाकरे बालिश असल्याची टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या प्रश्नाला मी अजिबात उत्तर देणार नाही. कोण आदित्य ठाकरे? कोण आहेत तो? काय आहे त्याला प्रतिष्ठा? बालिश आहे तो. एकनाथ शिंदे भाजपसोबत नाही गेले. ते शिवसेना पक्ष घेऊन आले.

एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपची युती आहे. तुम्ही आता शाळेतील मुलांचेही प्रश्न विचाराल का? असा संतप्त सवाल नारायण राणे यांनी केला आहे. अशा प्रश्नांची का दखल घेता. मी त्याचा उत्तर देणार. बालिशपणा आहे. काहीही बोलतो. कोणत्या वर्षात बोलले होते? असंही राणे म्हणाले. तर आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करायला हवी असं नितेश राणे यांनी म्हंटलं आहे.

आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?

आदित्य ठाकरे म्हणाले, “हे ४० लोकं त्यांच्या स्वत:च्या जागांसाठी आणि पैशांसाठी तिकडे गेले आहेत. सध्याचे मुख्यमंत्री त्यावेळी माझ्या घरी येऊन रडले होते. कारण त्यांना केंद्रीय यंत्रणा अटक करणार होत्या. त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी भाजपसोबत गेलो नाही तर मला अटक होईल”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Abdul Rahman : कोण आहे अब्दुल रहमान? ज्यानं भाजप नेत्याची धारदार शस्त्रानं केलीये हत्या, रहमानवर 'इतक्या' लाखांचं होतं बक्षीस!

Pune Rape Case: पुणे अत्याचार प्रकरणात ट्विस्ट! दोघांची आधीपासूनच ओळख, स्वतःच लिहली धमकी... स्प्रेचा वापर नाही, काय समोर आलं?

Sushil Kediya : मराठीत विचारताच चर्चेतून पळ काढला, ३० वर्षांपासून मुंबईत करतोय काय? कोण आहे सुशील केडिया?

शाळेच्या पहिल्याच दिवशी सातवीतल्या मुलाचा सायलंट हार्ट अटॅकने मृत्यू, नेमकं काय घडलं? CCTV फूजेट आलं समोर

SCROLL FOR NEXT