महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Resigns : 11 मे नंतर नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग; सोशल मिडियावर चर्चांना उधाण

शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग

धनश्री ओतारी

राज्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच त्यांचा वारसा कोण चालवणार हा प्रश्न उपस्थित असताना आता नव्या सरकार स्थापनेच्या चर्चेला उधाण आलं आहे. ( Adv Asim Sarode tweet on Sharad Pawar Resigns maharashtra politics )

मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा होतेय. तसेच, भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचे पोस्टर राज्यात अनेक ठिकाणी झळकले. दरम्यान, शरद पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनामा. या सर्व घडामोडी सुरु असताना अॅड. असीम सरोदे यांनी ट्विट करत मोठा दावा केला आहे. त्यांच्या या ट्विटमुळे सोशल मिडियावर चर्चांना उधाण आलं आहे.

अॅड. असीम सरोदे यांनी तर राष्ट्रवादीच्या अध्यक्ष निवडीची तारीख सांगतली आहे. शिवाय त्यानंतर होणाऱ्या मोठ्या राजकीय घडामोडींबाबतही दावा केला आहे.

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी 10 मे च्या आधी नक्की होतील. 11 मे नंतर नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग येणार हे सुद्धा नक्की”, असं असीम सरोदे म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय जबाबदारी सुप्रिया सुळे तर राज्यातली जबाबदारी अजित पवार यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. पण अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्ता बदलाचे वारे वाहू लागले आहे. राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी सध्या सुप्रीम कोर्टात सुरु आहे. अशातच नव्या सत्ता स्थापनेच्या चर्चेला वेग आला आहे. त्यामुळे सरकार पडू शकतं. अशावेळी अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याच संधी आहे. अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT