Adv Dr birendra saraf appointed as Advocate General of State of Maharashtra appointment cleared by Governor  
महाराष्ट्र बातम्या

Birendra Saraf : बिरेंद्र सराफ राज्याचे नवे महाधिवक्ता; राज्यपालांची मोहर

सकाळ डिजिटल टीम

ज्येष्ठ वकील डॉ बिरेंद्र सराफ यांची महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता म्हणून नियुक्ती झाली आहे. राज्याचे नवे महाधिवक्ता म्हणून ज्येष्ठ वकील बिरेंद्र सराफ यांच्या नियुक्तीला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजुरी दिली आहे.

महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी दिलेला राजीनामा राज्य सरकारने स्विकारला असून मंत्रिमंडळ बैठकीत सराफ यांच्या नावाची शिफारस करण्यात आली. त्यानंतर राज्य सरकारकडून बिरेंद्र सराफ यांचे नाव महाधिवक्तापदी निश्चित करण्यात आले. आज राज्यपालांनी सराफ यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली.

सराफ गेल्या 25 वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत आहेत, मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून त्यांनी पदवी प्राप्त केली आणि पदवीच्या तीनही वर्षात मुंबई विद्यापीठात ते अव्वल होते.

कनिष्ठ वकील म्हणून त्यांनी विद्यमान सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या चेंबरमध्ये काम केले. तर सराफ यांची 2020 मध्ये ज्येष्ठ वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी सहा वर्षे बॉम्बे बार असोसिएशनचे सचिव म्हणून काम केले आणि सध्या ते उपाध्यक्ष आहेत.

बिरेंद्र सराफ यांनी त्याच्या कारकिर्दीत, त्यांनी अनेक हाय-प्रोफाइल आणि वादग्रस्त प्रकरणे हाताळली आहेत. बॉलिवुड अभिनेत्रीच्या घरावर मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाई प्रकरणात सराफ यांनी कंगनाची बाजू मांडली होती. तसेच आर्यन खान ड्रग प्रकरणादरम्यान यापूर्वी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे प्रमुख असलेले आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांचेही त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या उपोषणाची सरकारला धास्ती! विखे पाटलांची सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक

Teachers Post : राज्यातील १३ हजार ११९ उमेदवारांची ‘शिक्षक’ पदासाठी निवड

Marathi News Live Updates : बिडकीन डीएमआयसीत महिलेच्या खुनाने खळबळ

Pune News : ‘आयसर’मध्ये आंदोलनाचा भडका; प्रशासनाच्या मनमानी कारभारावर ठपका

Shubman Gill on IND vs SL Draw: "२५० षटकं अन् सलग तीन दिवस फिल्डिंग..." फॉलोऑननंतरही सामना ड्रॉ राहिल्याबद्दल गिल काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT